
सणासुदीच्या काळात नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Mahindra च्या गाड्यांवरील फेस्टिव्ह ऑफर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ऑक्टोबर 2026 मध्ये कंपनीच्या काही लोकप्रिय SUV मॉडेल्सवर कॅश डिस्काउंट आणि मोफत अॅक्सेसरीजचे फायदे मिळत आहेत. विशेष म्हणजे, काही निवडक व्हेरिएंट्सवर ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करता येऊ शकते, तर Scorpio N च्या एका व्हेरिएंटवर एकूण ₹1.5 लाखांपर्यंत फायदा मिळत असल्याचा दावा आहे.
Mahindra XUV 3XO, Scorpio Classic आणि Scorpio N या लोकप्रिय SUV वर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. मात्र, ही सूट गाडीच्या व्हेरिएंटनुसार बदलते. चला तर जाणून घेऊया, कोणत्या SUV वर किती डिस्काउंट मिळू शकतो.
1. Mahindra XUV 3XO वर ₹60,000 पर्यंत बचतीची संधी
Mahindra XUV 3XO खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटनुसार वेगवेगळे फायदे उपलब्ध आहेत. XUV 3XO च्या MX2 Pro, MX3 आणि MX3 Pro या पेट्रोल व्हेरिएंट्सवर ₹40,000 पर्यंत कॅश डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय ₹20,000 किमतीच्या अॅक्सेसरीजचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे एकूण फायदा ₹60,000 पर्यंत पोहोचू शकतो. दुसरीकडे, डिझेल व्हेरिएंट्सवर ₹10,000 कॅश डिस्काउंट आणि ₹15,000 किमतीच्या अॅक्सेसरीजचा लाभ दिला जात आहे. म्हणजेच, डिझेल मॉडेलवर एकूण ₹25,000 पर्यंत बचत करण्याची संधी आहे.
2. Mahindra Scorpio Classic वर ₹45,000 पर्यंत डिस्काउंट
Mahindra Scorpio Classic च्या दोन्ही व्हेरिएंट्सवरही फेस्टिव्ह ऑफर्सचा लाभ मिळू शकतो. मात्र, S आणि S11 या व्हेरिएंट्ससाठी कॅश डिस्काउंटची रक्कम वेगवेगळी आहे.
Scorpio Classic S: या व्हेरिएंटवर ₹15,000 कॅश डिस्काउंट आणि ₹20,000 किमतीच्या अॅक्सेसरीज मिळू शकतात. त्यामुळे एकूण फायदा ₹35,000 पर्यंत होऊ शकतो.
Scorpio Classic S11: या टॉप व्हेरिएंटवर ₹25,000 कॅश डिस्काउंटसह ₹20,000 किमतीच्या अॅक्सेसरीजचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना एकूण ₹45,000 पर्यंत बचत करता येऊ शकते.
Mumbai Crime News: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना राजस्थानमधील ...
3. Mahindra Scorpio N वर ₹1.5 लाखांपर्यंत फायदा
या फेस्टिव्ह ऑफर्समध्ये Mahindra Scorpio N सर्वाधिक चर्चेत आहे. विशेषतः Scorpio N Z8L 7-Seater 4WD AT या व्हेरिएंटवर मोठ्या डिस्काउंटचा लाभ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या मॉडेलवर ₹1.25 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि ₹25,000 किमतीच्या अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत. हे दोन्ही फायदे एकत्र केल्यास एकूण बचत ₹1.5 लाखांपर्यंत होऊ शकते. Scorpio N च्या 2WD AT व्हेरिएंट्सवरही ऑफर उपलब्ध आहे. या मॉडेल्सवर ₹50,000 कॅश डिस्काउंट आणि ₹25,000 किमतीच्या अॅक्सेसरीजचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे एकूण फायदा ₹75,000 पर्यंत होण्याची शक्यता आहे.
Mahindra SUV खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
Mahindra च्या या फेस्टिव्ह ऑफर्समुळे SUV खरेदी करताना ग्राहकांना चांगली बचत करता येऊ शकते. मात्र, प्रत्यक्षात मिळणारी सूट ही व्हेरिएंट, शहर, डीलरशिप, उपलब्ध स्टॉक आणि कंपनीच्या लागू अटींनुसार बदलू शकते. तसेच, अॅक्सेसरीजच्या स्वरूपात मिळणारा लाभ हा थेट रोख सवलत असेलच असे नाही. त्यामुळे गाडी बुक करण्यापूर्वी जवळच्या अधिकृत Mahindra डीलरकडून कॅश डिस्काउंट, अॅक्सेसरीज, अंतिम ऑन-रोड किंमत आणि ऑफरच्या अटींची खात्री करून घ्या. प्रत्यक्ष खरेदीपूर्वी संबंधित डीलरकडून त्यांची वैधता आणि उपलब्धता तपासणे आवश्यक आहे.





