
मुंबई : मुंबईकरांना सध्या तीव्र उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत असून, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वीकेंडला किंचित दिलासा मिळाल्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच उकाडा पुन्हा वाढला आहे. सकाळी किमान तापमान 29अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासात उष्णतेचा पारा 38.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता.
वीकेंडला मिळाला होता दिलासा
गेल्या आठवड्यात तीव्र उष्णतेचा सामना केल्यानंतर वीकेंडला मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. रविवारी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 34.3 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे 33.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, तापमानात किंचित घट झाली असली तरी हवेतील आर्द्रता 91 टक्क्यांवर पोहोचल्याने उकाडा कायम राहिला. प्रतिचक्री वावटळ आणि पूर्वेकडील वाऱ्यांमुळे ऑक्टोबर महिन्यात मुंबईत विक्रमी उष्णता पाहायला मिळाली आहे.
21 ऑक्टोबरला पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत बुधवार म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी हवामानात बदल होऊन आकाश ढगाळ राहण्याची आणि हलक्या सरी किंवा गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, महाराष्ट्रातील काही अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर मुंबईतील जुहू परिसरात अज्ञातांकडून गोळीबार ...
हवेची गुणवत्ता धोकादायक श्रेणीत
तापमानासोबतच मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेतही मोठी घसरण झाली असून सोमवारी सकाळी शहराचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 253 नोंदवला गेला. हा निर्देशांक 'अस्वास्थ्यकर' (Unhealthy) श्रेणीत मोडतो. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यासमोर नवीन समस्या निर्माण झाली असून, विशेषतः श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




