नभी झळकले नारीशौर्य! भारतीय वायुसेनेतील १० प्रेरणादायी महिला पायलटची गाथा

महिला शक्तीचा आकाशात डंका! भारताच्या १० धाडसी महिला फायटर पायलट्सची प्रेरणादायी कहाणी  

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

१. हरिता कौर देओल    चंदीगडच्या हरिता यांनी २ सप्टेंबर १९९४ रोजी Avro HS-748 विमान १०,००० फुटांच्या उंचीपर्यंत एकटीने उडवून इतिहास रचला. को-पायलटशिवाय विमान चालवणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला पायलट ठरल्या.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

२. अवनी चतुर्वेदी    मध्य प्रदेशातील कोठीकंचन गावातील अवनी या देशाच्या पहिल्या महिला फायटर पायलटपैकी एक आहेत. त्यांनी २०१८ मध्ये मिग-२१ (MIG-21) विमान एकटीने उडवले, तर २०२३ मध्ये परदेशातील 'वीर गार्डियन २०२३' या हवाई युद्धाभ्यासात भाग घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला पायलट ठरल्या.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

३. भावना कंठ    बिहारच्या दरभंगामधून आलेल्या भावना या २०१८ मध्ये देशाच्या पहिल्या महिला फायटर पायलट्सच्या बॅचमध्ये सामील झाल्या. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांना प्रतिष्ठित 'नारी शक्ती पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

४. मोहना सिंह    झुंझुनूच्या कन्या मोहना यांनी स्वदेशी बनावटीचे 'एलसीए तेजस' (LCA Tejas) विमान उडवणारी पहिली महिला फायटर पायलट बनण्याचा बहुमान मिळवला आहे. स्क्वॉड्रन लीडर पदापर्यंत मजल मारत त्यांनी वायुसेनेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

५. शिवांगी सिंह    फ्रान्सवरून आलेल्या राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीतील 'गोल्डन एरो स्क्वॉड्रन'मध्ये वाराणसीच्या शिवांगी सिंह यांची पहिली महिला फ्लाईट लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली. ही देशासाठी अत्यंत अभिमानास्पद कामगिरी ठरली.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

६. माव्या सूदन    जम्मू-काश्मीरमधील राजौरीच्या माव्या या राज्याच्या पहिल्या आणि देशाच्या १२ व्या महिला फायटर पायलट बनत संपूर्ण देशात राज्याचे नाव उंचावले आहे.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

६. माव्या सूदन    जम्मू-काश्मीरमधील राजौरीच्या माव्या या राज्याच्या पहिल्या आणि देशाच्या १२ व्या महिला फायटर पायलट बनत संपूर्ण देशात राज्याचे नाव उंचावले आहे.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

८. शालिजा धामी    ग्रुप कॅप्टन शालिजा या भारतीय वायुसेनेच्या फायटर युनिटची कमान सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. चेतक आणि चिता हेलिकॉप्टरसाठी त्या IAF च्या पहिल्या महिला फ्लाईलिंग इन्स्ट्रुक्टर देखील राहिल्या आहेत.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट

९. मिंटी अग्रवाल    बालाकोट एअर स्ट्राइकदरम्यान आपल्या अफाट शौर्य आणि समजूतदारपणाने F-16 विमान पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंबालाच्या मिंटी अग्रवाल या 'युद्ध सेवा पदक' (Yudh Seva Medal) मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

फोटो सौजन्य : पिंटरेस्ट