केएल राहुलची 'SENA' देशांमध्ये अद्वितीय कामगिरी, नोंदवला असा विक्रम

केएल राहुलची 'SENA' देशांमध्ये अद्वितीय कामगिरी, नोंदवला असा विक्रम

फोटो सौजन्य :  ANI

दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात (SENA) फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक असतं.

फोटो सौजन्य :  ANI

अशा आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर केएल राहुल याने आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

फोटो सौजन्य :  ANI

न्यूझीलंडच्या वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुलने अर्धशतक ठोकलं आणि नावावर एक मोठा विक्रम केला आहे.

फोटो सौजन्य :  ANI

सेना देशांमध्ये सलामीवीर म्हणून 50पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

न्यूझीलंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या राहुलने संयमी फलंदाजी करत नाबाद 52 धावा करून हा विशेष विक्रम साधला.

फोटो सौजन्य :  ANI

केएल राहुलने  सेना (SENA) देशांमध्ये एकूण 13 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 

फोटो सौजन्य :  ANI

इंग्लंडमध्ये सात वेळा (4 शतके आणि 3 अर्धशतक), ऑस्ट्रेलियामध्ये तीन वेळा (1 शतक आणि 2 अर्धशतक) 50हून अधिक धावा केल्या.

फोटो सौजन्य :  ANI

दक्षिण आफ्रिकेत 2 वेळा (1 शतक आणि 1 अर्धशतक) आणि न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये नाबाद 52 धावांच्या अर्धशतकाचा समावेश आहे. 

फोटो सौजन्य :  ANI