रामललाच्या दर्शनाचे नियम बदलले! 1 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन वेळापत्रक

रामललाच्या दर्शनाचे नियम बदलले! 1 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन वेळापत्रक

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिरात दर्शन आणि आरतीच्या वेळा बदलणार आहेत.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

श्री राम जन्मभूमी मंदिरातील दैनंदिन पूजा, आरती, भोग, विश्राम आणि दर्शनाच्या वेळापत्रकात ऋतूमानातील बदलांनुसार बदल करण्यात आला आहे.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

सध्या मंदिराचे दरवाजे पहाटे 3:45 वाजता उघडतात आणि रात्री 10:30 वाजता बंद होतात. नवीन वेळापत्रकानुसार पहाटे 4 वाजता उघडतील आणि रात्री 10 वाजता बंद होतील.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

मंगला आरती पहाटे 4:30  ते 4:40 या वेळेत होईल. अभिषेक, शृंगार, धूपदीप आणि नैवेद्यासाठी पहाटे 4:40 ते 6:30 पर्यंत दरवाजे बंद राहतील. 

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

शृंगार आरती सकाळी 6:30 वाजता सुरू होईल आणि भाविकांसाठी दर्शन सकाळी 7 वाजता सुरू होईल.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

सकाळी 8:00 ते 8:10 या वेळेत बालभोगासाठी विश्रांती असेल. यानंतर, सकाळी 11:30 पर्यंत दर्शन सुरू राहील.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

राजभोग अर्पणासाठी सकाळी 11:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दरवाजे बंद राहतील आणि दुपारी 12 वाजता राजभोग आरती होईल. 

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

श्री रामलल्ला दुपारी 13:30 ते 1:30 पर्यंत विश्रांती घेतील. पुजाऱ्यांच्या प्रवेशानंतर आणि अल्पभोग अर्पण झाल्यावर, दुपारी 1:35 वाजता दर्शन पुन्हा सुरू होईल आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहील.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

बालभोग दुपारी 4:00 ते 4:10 पर्यंत होईल, त्यानंतर सायंकाळी 6:45 पर्यंत दर्शन चालेल. सायंकाळी 6:45 ते 7:00 पर्यंत धूप-दीप आणि नैवेद्यासाठी दरवाजे बंद राहतील.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर

सायंकाळी 7 वाजता आरती होईल. रात्री 8 ते 8:30 आणि रात्री 9:15 ते 9:30 पर्यंतही धूप-दीप आणि नैवेद्यासाठी दरवाजे बंद राहतील. रात्री 9:30 वाजता शयन आरतीनंतर रात्री 10 वाजता दरवाजे बंद होतील.

फोटो सौजन्य :  श्री रामजन्मभूमी ट्वीटर