सूर्यकुमार यादवला रणजी ट्रॉफी खेळायची होती, पण...

सूर्यकुमार यादवला रणजी ट्रॉफी खेळायची होती, पण...

फोटो सौजन्य :  ANI

सूर्यकुमार यादवने 2026 मध्ये भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले.

फोटो सौजन्य :  ANI

भारताचा माजी टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला संपूर्ण 2026-27  रणजी ट्रॉफी हंगामात मुंबईकडून खेळायचे होते.

फोटो सौजन्य :  ANI

सूर्यकुमारला देशांतर्गत क्रिकेट खेळून आपला फॉर्म दाखवून द्यायचा होता. पण त्याला येथेही डावललं गेलं आहे.

फोटो सौजन्य :  ANI

सूर्यकुमार बऱ्याच काळापासून लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळलेला नसल्याने त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल बरीच चर्चा झाली होती.

फोटो सौजन्य :  ANI

मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या संघात त्याच्या नावाचा समावेश नव्हता. सूर्यकुमार शेवटचा रणजी ट्रॉफी सामना फेब्रुवारी 2025 मध्ये नागपूर येथे विदर्भाविरुद्ध खेळला होता. 

फोटो सौजन्य :  ANI

क्रिकबझच्या वृत्तानुसार, सूर्यकुमारने संघात सामील होण्याची इच्छा व्यक्त करणारा संदेश निवड समितीला पाठवला होता. मात्र, निवड समितीने त्याला न निवडण्याचा निर्णय घेतला.

फोटो सौजन्य :  ANI

सूर्या गेल्या 18 महिन्यांत एकही रेड बॉल सामना खेळलेला नाही. त्यामुळे आमची इच्छा आहे की त्याने काही सामने खेळावेत आणि त्यानंतर तो संघात सामील होऊ शकेल. असे पवार यांनी क्रिकबझला सांगितले.

फोटो सौजन्य :  ANI