IND vs NZ सामन्यात दोन तासांचा विलंब महागात पडेल! न्यूझीलंडमध्ये रात्री 8 वाजता काय घडणार?

IND vs NZ सामन्यात दोन तासांचा विलंब महागात पडेल! न्यूझीलंडमध्ये रात्री 8 वाजता काय घडणार?

फोटो सौजन्य :  BCCI

न्यूझीलंडमध्ये जेव्हा डे नाईट टी20 सामना खेळला जातो, तेव्हा त्याची सुरुवात संध्याकाळी 6 वाजता होते. 

फोटो सौजन्य :  BCCI

पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. म्हणजेच दोन तास उशिरा सुरू होईल. 

फोटो सौजन्य :  BCCI

सामना न्यूझीलंडमध्ये रात्री 8 वाजता सुरू होईल, तेव्हा भारतात दुपारचे 12.30 वाजलेले असतील. यामुळेच न्यूझीलंडमध्ये सामना दोन तास उशिरा सुरू होत आहे.

फोटो सौजन्य :  BCCI

या दोन तासांच्या विलंबाचे भारतीय संघावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. भारतीय संघासाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते.

फोटो सौजन्य :  BCCI

न्यूझीलंडमध्ये रात्री 8 वाजता जोरदार वारे वाहू लागतात. हवामान अचानक थंड होते. म्हणजेच तापमानात लक्षणीय घट होते.

फोटो सौजन्य :  BCCI

भारतीय संघाने दुपारी सराव केला आहे, पण सामना रात्री होणार असल्याने भारतीय खेळाडूंना हवामानाशी जुळवून घेणे कठीण जात आहे.

फोटो सौजन्य :  BCCI

न्यूझीलंडच्या या मैदानावर चेंडू खूप स्विंग होऊ शकतो, ज्यामुळे भारताच्या अव्वल फळीसाठी समस्या निर्माण होऊ शकते. 

फोटो सौजन्य :  BCCI

एकदा स्थिरावल्यावर धावा करता येत असल्या तरी, स्थिरावल्यावर लगेच षटकार मारणे खूप कठीण आहे.

फोटो सौजन्य :  BCCI