विराट कोहलीची नजर 13 हजार धावांच्या महाविक्रमावर

विराट कोहलीची नजर 13 हजार धावांच्या महाविक्रमावर

फोटो सौजन्य :  ANI

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीला एक मोठा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे.

फोटो सौजन्य :  ANI

या सामन्यात 12 धावा करताच विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 13000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरेल.

फोटो सौजन्य :  ANI

वनडे क्रिकेटच्या इतिहासात जगातील कोणत्याही फलंदाजाने आजपर्यंत हा विक्रम केलेला नाही. त्यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल.

फोटो सौजन्य :  ANI

विराट कोहलीने 250 डावांमध्ये 61.55 च्या सरासरीने आणि 95.4 च्या स्ट्राइक रेटने 12988 धावा केल्या आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

विराट कोहलीने या क्रमांकावर खेळताना 48 वनडे शतके आणि 69 अर्धशतकं ठोकली आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने 12662 धावा केल्या असून कोणत्याही फलंदाजाने 10000 धावासुद्धा पूर्ण केलेल्या नाहीत.

फोटो सौजन्य :  ANI

क्रिकेटच्या इतिहासात एका विशिष्ट फलंदाजीच्या स्थानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने सलामी करताना 15310 धावा केल्या आहेत.

फोटो सौजन्य :  ANI