एका दुखापतीमुळे करिअर संपणार होतं? रोहित शर्माबाबत मोठा खुलासा

एका दुखापतीमुळे करिअर संपणार होतं? रोहित शर्माबाबत मोठा खुलासा

फोटो सौजन्य :  ANI

रोहित शर्मा पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप खेळण्याची तयारी करत आहे. यासाठी त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

फोटो सौजन्य :  ANI

टीम इंडियाचे माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनी एका पॉडकास्टमध्ये रोहित शर्माबद्दल मोठा खुलासा केला आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

सोहम देसाई यांनी रोहित शर्मा मेहनत करत नाही किंवा सरावाकडे दुर्लक्ष करतो, हे आरोप फेटाळून लावले आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान रोहितला कमरेला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याचे संपूर्ण करिअर धोक्यात आले होते.

फोटो सौजन्य :  ANI

'जर रोहितवर वेळेवर शस्त्रक्रिया झाली नसती, तर त्याचे करिअर संपुष्टात आले असते, असं त्यांनी सांगितलं.' 

फोटो सौजन्य :  ANI

'दुखापतीपासून रोहितच्या कमरेचा भाग अत्यंत संवेदनशील बनला आहे. तेव्हापासून तो आठवड्यातून किमान दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग करत आहे.'

फोटो सौजन्य :  ANI

'गेल्या 7-8  वर्षांपासून रोहितसाठी हा प्रशिक्षण दिनक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जर त्याने आपल्या फिटनेसवर इतकी मेहनत घेतली नसती, तर तो इथपर्यंत कधीच पोहोचला नसता.'

फोटो सौजन्य :  ANI