फोटो सौजन्य : ANI
2023 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर इशान किशनला संघातून वगळण्यात आले.
फोटो सौजन्य : ANI
कोणत्याही खेळाडूसोबत अशी घटना घडते, तेव्हा त्यातून सावरणे सोपे नसते. इशान किशनने तो काळ आठवत भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
फोटो सौजन्य : ANI
इशान म्हणाला की, "जेव्हा मला आंतरराष्ट्रीय संघातून वगळण्यात आले, तेव्हा मला माझ्या काही चुकांचे परिणाम पूर्णपणे समजले."
फोटो सौजन्य : ANI
"मी माझ्या फिटनेस आणि फलंदाजीवर खूप मेहनत घेतली. मी संयम राखला आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून माझ्या चुका सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले."
फोटो सौजन्य : ANI
मला पूर्ण विश्वास होता की जर मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत राहिलो, तर संधीची दारे आपोआप उघडतील.
फोटो सौजन्य : ANI
इशान किशनने या वर्षी जानेवारीमध्ये केलेल्या पुनरागमनापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्याने पुरेपूर सोने केले आहे.
फोटो सौजन्य : ANI