धुक्यात गाडी चालवताना कोणती लाईट वापराल? एक चूक पडू शकते महागात!

धुक्यात गाडी चालवताना कोणती लाईट वापराल? एक चूक पडू शकते महागात!

धुक्यात लो बीम हेडलाइटचा वापर करा. यामुळे रस्त्यावरील समोरच्या गोष्टी दिसायला मदत होते.

हाय बीमचा वापर टाळायला हवा. धुक्यात High Beam चा प्रकाश पाण्याच्या सूक्ष्म थेंबांवर पडून परत डोळ्यांकडे येतो.

फ्रंट फॉग लॅम्प सुरू करा. हे दिवे कारच्या खालच्या बाजूला असतात आणि रस्त्याचा जवळचा भाग पाहण्यास मदत करतात.

रिअर फॉग लॅम्पचा योग्य वापर करा. कमी दृश्यमानता असताना रिअर फॉग लॅम्प सुरू केल्याने मागील वाहनांना तुमची कार ओळखणे सोपे जाते.