डिसेंबरपासून UPI ​​वापरून तुमचे PF चे पैसे काढू शकणार? नवे अपडेट जाणून घ्या

डिसेंबरपासून UPI ​​वापरून तुमचे PF चे पैसे काढू शकणार? नवे अपडेट जाणून घ्या

फोटो सौजन्य :  AI

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या पीएफ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

फोटो सौजन्य :  AI

डिसेंबरपासून तुम्हाला तुमच्या पीएफमधील शिल्लक रक्कम तात्काळ काढता येण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या सेवानिवृत्ती निधीचा वापर करणे अधिक सोपे होईल.

फोटो सौजन्य :  AI

युपीआयद्वारे पीएफ निधी काढण्याची सुविधा डिसेंबर 2026 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणताही अधिकृत माहिती नाही. 

फोटो सौजन्य :  AI

या नवीन प्रणालीमुळे दावा मंजूर होणे आणि खात्यात रक्कम जमा होणे यामधील वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, असं बोललं जात आहे.

फोटो सौजन्य :  AI

ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत, जलद स्वयंचलित दावे, त्वरित पैसे काढणे आणि सुधारित डिजिटल सेवांसाठी एका नवीन आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

फोटो सौजन्य :  AI

एपीआय विकसित करण्याचे आणि ते बँकिंग व पेमेंट प्रणालींशी जोडण्याचे तांत्रिक काम पूर्ण झाले आहे. आता त्याची अमलबजावणी केली जाणार आहे.

फोटो सौजन्य :  AI

पीएफ सदस्य भीम ॲपद्वारे यूपीआय वापरून मंजूर केलेली रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवू शकतील.

फोटो सौजन्य :  AI