Home मनोरंजन अनुष्काचा शिवराळ ‘एनएच १०’

अनुष्काचा शिवराळ ‘एनएच १०’

1

अनुष्का शर्माच्या १० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ६ मार्च रोजी प्रदर्शित होणारा ‘एनएच १०’ हा पहिला चित्रपट असेल ज्याला सेन्सॉर बोर्डकडून ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.

या चित्रपटाबद्दल अनुष्का सांगते, ‘ए’ सर्टिफिकेट’ असलेला हा माझा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात शिव्या आहे. मुळात हा चित्रपट वास्तवाशी जवळीक साधणारा आहे. त्यामुळे यात शिव्यांचा सर्रास वापर करण्यात आला आहे.

रोजच्या जीवनातही अनेक जण शिव्या देतातच की. शिव्यांच्या जागी चित्रपटात बीपचा वापर केला असता तर चित्रपटाचा फ्लो तुटला असता. त्यामुळे चित्रपट अधिक वास्तववादी वाटण्यासाठी या शिव्या अशाच ठेवण्यात आल्या आहेत.

तुझ्या तोंडून शिव्या येतात का यावर अनुष्का म्हणते, याकडे इतकं लक्ष नाही दिलं. कारण आतापर्यंत कोणी मला याबाबत कधीच काही बोललं नाही. हो पण कधी तरी माझ्याही तोंडून एखाद-दुसरी शिवी निघतेच. तसं मी स्वत:ला रागापासून जरा लांबच ठेवते. त्यामुळे शिव्या देण्याची तशी वेळच येत नाही.

अनुष्काचा बॉयफ्रेण्ड विराट कोहलीचा क्रिकेटच्या मैदानातील राग तुम्हा-आम्हाला सर्वानाच माहीत आहे. कलाकार – क्रिकेटर राजरोसपणे शिव्यांचा वापर करतात, यावर अनुष्का म्हणते, कलाकार असो वा क्रिकेटर. अखेर सगळे समाजातच वावरतात. समाजातील लोक जर शिव्या देतात मग त्यांनी का नाही द्यायच्या? हो.. पण एखाद्याला कोणी विनाकारण शिव्या देत असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version