Home महामुंबई अभिनेत्री प्रीती झिंटाने पकडून दिले दोन आरोपी

अभिनेत्री प्रीती झिंटाने पकडून दिले दोन आरोपी

1

पादचा-याला धडक देऊन पळालेल्या रुग्णवाहिकेचे पाठलाग केलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मेहनतीला फळ मिळाले आहे.

मुंबई- पादचा-याला धडक देऊन पळालेल्या रुग्णवाहिकेचा पाठलाग केलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मेहनतीला फळ मिळाले असून याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

२१ एप्रिल रोजी प्रीती विमानतळाच्या दिशेने जात असताना गणपत गौणाक(५७) या पादचा-याला रुग्णवाहिकेने उडवले होते. त्यात त्याच्या पायाला फॅक्चर झाली होती. त्याचा पाठलाग करून तिने या रुग्णवाहिकेचा क्रमांक पोलिसांना सांगितला होता.

चौकशी दरम्यान ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी आता विलेपार्ले पोलिसांनी रुग्णवाहिकेचा चालक प्रशांत महाडिक व मालक परशुराम कांबळे याला अटक केली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version