Home क्रीडा आयसीसी जागतिक संघ जाहीर

आयसीसी जागतिक संघ जाहीर

1

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निवड केलेल्या जागतिक संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळाले नाही.

मेलबर्न- आयसीसीने निवड केलेल्या जागतिक संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळाले नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील यंदाची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्वोत्तम जागतिक संघाची घोषणा केली. या जागतिक संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आलेले नाही.

आयसीसीने विश्वचषकातील कामगिरीच्या आधारावर आयसीसीने हा संघ निवडला आहे. सोमवारी जाहीर केलेल्या जागतिक संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅककलम याच्याकडे दिले आहे.

या संघात न्यूझीलंडचे पाच, ऑस्ट्रेलियाचे तीन, दक्षिण आफ्रिकेचे दोन आणि एक श्रीलंकेच्या खेळाडूचा समावेश आहे. तर, झिंबाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर याचा १२ वा खेळाडू म्हणून संघात समावेश केला आहे.

आयसीसी संघ- ब्रेंडन मॅककलम (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, कुमार संगकारा, स्टिव्ह स्मिथ, एबी डिव्हिलर्स, ग्लेन मॅक्सवेल, कोरे अँडरसन, डॅनिएल व्हिटोरी, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मॉर्ने मॉर्केल, ब्रेंडन टेलर (बारावा खेळाडू)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version