Home Uncategorized एलआयसीला अर्ध्या तासात ७ हजार कोटींचा फटका

एलआयसीला अर्ध्या तासात ७ हजार कोटींचा फटका

1
LIC

मुंबई- भांडवली बाजारात झालेल्या घसरणीत भारतीय विमा कंपन्यांचे मंगळवारी तब्बल १० हजार कोटींचे नुकसान झाले. यामध्ये एफपीआय कंपनीचे सर्वाधिक ९ हजार कोटींचे नुकसान झाले.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने सिगारेटवरील उपकर (सेस) वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंगळवारी भांडवली बाजारात आयटीसी या तंबाखू उत्पादक कंपनीच्या समभागात मोठी घसरण पाहायला मिळाली. यावेळी आयटीसीच्या समभागांची किंमत १५ टक्क्यांनी घसरली.

मात्र, त्यामुळे आयटीसीच्या सर्वात जास्त समभागांची मालकी असलेल्या जीवन विमा निगमला (एलआयसी) मोठा फटका बसला आहे. आज भांडवली बाजार उघडल्यानंतर अवघ्या अध्र्या तासात एलआयसीच्या ७००० कोटी रुपयांची राख-रांगोळी झाली. ३० जून २०१७ रोजी एलआयसीकडे आयटीसीच्या १६.२९ टक्के समभागांची मालकी होती. गेल्या चार वर्षापासून एलआयसी आयटीसीमध्ये भागीदारी वाढवत आहे. २०१३ मध्ये एलआयसीचे आयटीसीमध्ये १२.१७ टक्के शेअर होते.

दरम्यान, भांडवली बाजारात झालेल्या घसरणीत भारतीय विमा कंपन्यांचे तब्बल १० हजार कोटींचे नुकसान झाले. यामध्ये एफपीआय कंपनीचे सर्वाधिक ९ हजार कोटींचे नुकसान झाले. यापूर्वी १९९२ मध्ये आयटीसीचे शेअर मोठय़ा प्रमाणावर कोसळले होते. त्यानंतर कंपनीचे शेअर १५ टक्क्यांनी गडगडले.

याबद्दल बोलताना फ्रँकलिन टेम्पल्टन इन्व्हेंसमेंटच्या सुकुमार राजा यांनी सांगितले की, गुंतवणूकदार म्हणून आम्ही दर्जा, शाश्वतपणा आणि विकासाच्या कसोटय़ांवर समभागांचे मूल्यमापन करतो. मात्र, तंबाखू उत्पादक कंपन्यांचे समभाग नेहमीच अस्थिर असतात. त्यामुळे गुंतवणूकदार या समभागांमध्ये तितकीशी गुंतवणूक करत नाहीत, असे राजा यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. एल.आय.सी. ने केलेली गुंतवणूक विचारपूर्वक केली असावी. समभागांचे भाव वर खाली होणे हे शेअर मार्केट मध्ये सतत चालूच असते. उल्लेख केलेले सदर समभाग जोपर्यंत तोटा सोसून विकले जात नाहीत तोपर्यंत नुकसान हे केवळ काल्पनिकच असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version