Home एक्सक्लूसीव्ह ए.सी. बसमध्ये लहान मुलांना अर्धे तिकीट

ए.सी. बसमध्ये लहान मुलांना अर्धे तिकीट

1

बेस्टच्या वातानुकूलित बसमधून १३ वर्षाखालील मुलांचे तिकीट हे निम्मे असावे, असा नियम आहे. तरी प्रत्यक्षात बेस्टच्या वातानुकूलित बसमधून प्रवास करणा-या या बच्चेमंडळींकडून प्रौढांप्रमाणेच पूर्ण तिकीट कापले जायचे.

मुंबई- बेस्टच्या वातानुकूलित बसमधून १३ वर्षाखालील मुलांचे तिकीट हे निम्मे असावे, असा नियम आहे. तरी प्रत्यक्षात बेस्टच्या वातानुकूलित बसमधून प्रवास करणा-या या बच्चेमंडळींकडून प्रौढांप्रमाणेच पूर्ण तिकीट कापले जायचे. त्याचा मोठा फटका वातानुकूलित बसला बसला आहे.  त्यामुळे आता ही चूक बेस्टने सुधारली असून मुलांना अर्धे तिकीटच आकारण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

बेस्टने १९९८ पासून वातानुकूलित बसगाडया सुरू केल्या. रस्त्यांवरील खासगी वाहनांचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी बेस्टने वातानुकूलित बससेवा एकूण २३ बस मार्गावर सुरू केली; परंतु ही सर्व सेवा तोटयात असून खासगी वाहनांप्रमाणे बेस्टच्या गाडया प्रवाशांच्या निवासस्थानांपासून कार्यालयापर्यंत थेट परिवहन सेवा देऊ शकत नसल्यामुळे तिला प्रतिसाद मिळत नाही.

[poll id=”1018″]

त्यामुळे बससेवेवरील प्रवाशांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी कर्मचारी व अधिका-यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये वातानुकूलित बस मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मुलांना सवलतीच्या प्रवासभाडयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे १३ वर्षाखालील मुलांना सवलतीचे प्रवासभाडे आकारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

ही सवलत दिल्यास वातानुकूलित बसमधील प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल. त्याबाबत प्रस्ताव बेस्ट उपक्रमाने मंजुरीकरता बेस्ट समितीपुढे मंजुरीसाठी मांडला आहे.

सध्या एकूण २३ मार्गावर सुरू असलेल्या वातानुकूलित बससेवेत दैनिक, मासिक आणि त्रमासिक बसपास उपलब्ध आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचे सवलतीचे प्रवासभाडे या बससेवांना देण्यात येत नाही. त्यामुळेच वातानुकूलित बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांकडून तिकीट भाडे पूर्ण आकारले जाते. परिणामी एकत्रित कुटुंबाने मुलांसह प्रवास करणारे प्रवासी या बस सेवांचा लाभ घेण्यास उत्सुक नसतात,असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

1 COMMENT

  1. बेस्ट ला सध्या चांगल्या व्यवस्थापनाची गरज आहे. चेंबूर सांताक्रूझ जोडमार्ग, पूर्व मुक्त मार्ग ह्या दोन मार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी झाले आहे ह्या मार्गांचा वापर करून जलद सेवा बेस्ट ने द्यावी पण अजून बेस्ट बसेस जुन्या मार्गावरून धावतात आणि वेळ वाया जात असल्यामुळे आणि भाव वाढीमुळे परिणामी लोकांनी बेस्ट कडे पाठ फिरवली आहे. दोन गाड्यांमधील अंतर व्यवस्थित करा एका वेळेला एकाच नंबरच्या दोन बस पाठोपाठ धावतात आणि वेळेला एकही बस नसते तसेच बेस्टच्या वातानुकुलीत बसेस सर्वाधिक खराब होतात त्या भंगारात काढून नवीन वोल्वो बसेस सेवेत आणाव्यात. बहुतेक बस मधील खराब सीट्स त्वरित बदलाव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version