Home किलबिल केकवर बसून आली मित्रांची स्वारी

केकवर बसून आली मित्रांची स्वारी

1

लहान लहान मुलांची मित्रमंडळी खूप असतात. केवळ शाळेतले मित्र-मैत्रिणीच नाही तर आई-बाबा, काका- काकू सगळेच. आमच्या अक्षराचेही मित्रमंडळी खूप आहेत. 

लहान लहान मुलांची मित्रमंडळी खूप असतात. केवळ शाळेतले मित्र-मैत्रिणीच नाही तर आई-बाबा, काका- काकू सगळेच. आमच्या अक्षराचेही मित्रमंडळी खूप आहेत. तिचा तिसरा वाढदिवस जवळच्याच हॉलमध्ये साजरा केला. त्यावेळी तिला शुभेच्छा द्यायला १५० हून जास्त मंडळी आली होती. त्याशिवाय काही मंडळी आलेली केकवर बसून. अक्षराच्या वाढदिवसासाठी वेगळा केक आणायचा आम्ही ठरवलं होतं. तिला वाघ, जिराफ, सिंह, ससा, हत्ती या प्राण्याचं खूपच वेड आहे. म्हणून या सगळ्या प्राण्यांनी सजवलेला केक तिच्या वाढदिवसासाठी आम्ही आणला.

केक पाहून तिही खूप खूश झाली होती. सगळे नातेवाईक आल्यावर केक कापून घेतला. केक कापताना स्नो स्प्रे, चमकी यांचा एकाच वेळी तिच्यावर वर्षाव झाला. त्यामुळे केक कापण्याचा आनंद आणखी वाढला. तिच्या छोटय़ा दोस्तांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाची मेजवानी ठेवली होती. त्यात पिझा, बर्गरपासून ते शेवपुरी, पानीपुरी, रगडा असं सगळं काही होतं. त्यामुळे केक कापल्या कापल्या सगळ्यांची स्वारी खाण्याकडे वळली. मोठी मंडळी अक्षराला भेटायला आली. सगळ्यांनी तिच्यासाठी खूप गिफ्ट आणले होते. पण नेहमीप्रमाणेच त्यामध्ये कपडय़ांची संख्या जास्त होती. त्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की त्यांनी आणलेले कपडे अक्षराने लगेच घालावे. पण सकाळपासून ती वाढदिवस साजरा करताना इतकी काही दमली होती की केक कापल्यानंतर लगेच ती झोपून गेली. बिचा-या पाहुणे मंडळींना तिला नीट विश करता आलं नाही. पण तरीसुद्धा खाण्यापिण्याचा आस्वाद घेत त्यांनी अक्षराची पार्टी एन्जॉय केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version