Home महाराष्ट्र कोकण कोकण रेल्वेला गाड्या मिळाल्या, पण थांबेच नाहीत

कोकण रेल्वेला गाड्या मिळाल्या, पण थांबेच नाहीत

2

होळी आणि सुट्टीनिमित्त कोकणात जाणा-यांसाठी कोकण रेल्वेवर जादा गाड्या सोडण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मात्र या गाड्यांना कोकण रेल्वे मार्गावर मोजकेच थांबे देण्यात आल्याने याचा त्यांना कोणताच फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबई- होळी आणि सुट्टीनिमित्त कोकणात जाणा-यांसाठी कोकण रेल्वेवर जादा गाड्या सोडण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. त्यात होळीसाठी एलटीटी ते रत्नागिरी गाडीच्या १८ फे-या आणि उन्हाळी सुट्टीसाठी एलटीटी ते मडगाव या वातानुकूलित गाडीच्या २० फे-यांचा समावेश आहे. ही बाब कोकणवासीयांना सुखावणारी असली तरी या गाड्यांना कोकण रेल्वे मार्गावर मोजकेच थांबे देण्यात आल्याने याचा त्यांना कोणताच फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

होळीसाठी मध्य रेल्वे २३ मार्च ते ३१ मार्च दरम्यान एलटीटी ते रत्नागिरीदरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. या गाडीला कोकण रेल्वेच्या हद्दीत केवळ माणगाव, वीर, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर उन्हाळी सुट्टीसाठी एलटीटी ते मडगावदरम्यान ४ एप्रिल ते ६ जूनपर्यंत वातानुकूलित गाडी सोडण्यात येणार आहे. मात्र, या गाडीलाही ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या स्थानकांतच थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे खेड, राजापूर, कणकवली, सावंतवाडी यासारख्या नेहमीच गजबजलेल्या आणि अधिक प्रवासी असणा-या स्थानकांत ही गाडी थांबणार नाही. त्यामुळे गाड्या मिळाल्या, पण थांबे न मिळाल्याने कोकणवासीयांची गैरसोय कायम आहे.

कोकण रेल्वे मार्गावर कोणत्या स्थानकात गाडी थांबवायची आणि कोणत्या नाही, हे कोकण रेल्वेने ठरवायचे असते. त्यात मध्य रेल्वे काही करू शकत नाही. मध्य रेल्वेने होळी आणि सुट्टीसाठी जादा गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांना महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे नसतील तर त्यात म. रे. ची चूक नाही. – विद्याधर मालेगावकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, म.रे.

गाड्यांना कुठे थांबे द्यायचे, हे कोकण रेल्वेच्या अखत्यारित येत असले तरी ते थांबे काही निकषांनुसार दिले जातात. त्यानुसारच नवीन गाड्यांना थांबे दिले आहेत. त्यासाठी लोकांची मागणी, तिकीट विक्रीचे प्रमाण, इत्यादी बाबींचा विचार केला जातो. त्यामुळे कोकणवासीयांवर अन्याय होणार नाही, याची घेतली आहे. – सिद्धेश्वर तेलगू, मुख्य जनसंपर्क अधिकारी, को. रे.

2 COMMENTS

  1. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ या स्थानकांवर आधीच खूप रेल्वे थांबतात,
    खरी गरज उर्वरित कोकणातल्या स्थानकांवर गाड्या थांबवण्याची आहे.
    कोकण रेल्वे ने पुन्हा एकदा कोकणी माणसांची घोर निराशा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version