Home महाराष्ट्र कोकण कोकण रेल्वे मार्गावरील सौंदळ स्थानक मार्गी!

कोकण रेल्वे मार्गावरील सौंदळ स्थानक मार्गी!

1

सौंदळ रेल्वे स्थानकासाठी आग्रही असलेली संघर्ष समिती आणि त्याचे अध्यक्ष चंद्रकांत देशपांडे यांची एक दोन नव्हे; तर तब्बल २२ वर्षाची तपश्चर्या फळाला आली आहे.

राजापूर- सौंदळ रेल्वे स्थानकासाठी आग्रही असलेली संघर्ष समिती आणि त्याचे अध्यक्ष चंद्रकांत देशपांडे यांची एक दोन नव्हे; तर तब्बल २२ वर्षाची तपश्चर्या फळाला आली आहे. यंदाच्या मान्सूनच्या समाप्तीनंतर दसरा ते दिवाळी यादरम्यान २५ कोटी रुपये खर्चाच्या सौंदळ रेल्वे स्थानकाच्या शुभारंभाचा नारळ वाढवला जाणार आहे. तशी घोषणाच कोकण रेल्वेने केली आहे.

सौंदळ रेल्वे स्थानकाचे स्वप्न उराशी बाळगून संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुभाई देशपांडे धडपडत होते. गेल्या काही वर्षात प्रशासकीय स्तरावर तांत्रिक अडचणींच्या फे-यांत अडकलेल्या या स्थानकाच्या निर्णयातील अडसर आता दूर झाला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर राजापूर रोड आणि विलवडे या दोन स्थानकांदरम्यान असलेले प्रस्तावित सौंदळ रेल्वे स्थानक सुमारे ५० फूट उंचीवर उभारले जाणार आहे. या उंचीमुळे आणि काहीशा उतारामुळे कोकण रेल्वेचे अधिकारी या विषयालाच फाटा देण्याचे धोरण अनेक वर्षे राबवत होते, मात्र चंद्रकांत देशपांडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे स्थानक होणारच हे आता निश्चित झाले आहे.

दरम्यान, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी तीन दिवसांपूर्वीच सौंदळ येथे नव्याने भेट देऊन प्रस्तावित स्थानकाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या भरावासाठीच्या मातीच्या उपलब्धतेबाबत देशपांडे आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. स्थानक निर्मितीच्या दृष्टिकोनातून निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींनीही सध्या वेग घेतला आहे.

सौंदळ भेटीत निकम यांनी भरावासाठी लागणा-या शेकडो टन मातीबाबत जमीनमालक पाटील बंधू यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनीही त्यांच्या मालकीच्या जमिनीतून माती देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पावसाळयानंतर पहिल्या टप्प्यात भरावाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित सौंदळ रेल्वे स्थानकाबाबत शक्य-अशक्यतेच्या सर्व बाबी कोकण रेल्वेने स्थानक प्रस्तावित केल्याचे संकेतस्थळावर नमूद केल्याने निकाली निघाल्या आहेत. प्रारंभी विस्थापितांच्या न्याय हक्कासाठी आणि नंतर सौंदळ स्थानकासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थ आणि शेकडो सहका-यांसह २२ वर्षे यशस्वी लढा उभारणा-या चंद्रकांत देशपांडे यांच्या जिद्दीचेही कौतुक झाले आहे.

1 COMMENT

  1. येथे स्थानक व्हावे म्हणून २२ वर्षे झगडावे लागले कारण कोकण रेल्वे गुजरात मधून जात नाही आणि कोकण रेल्वे मार्ग पश्चिम रेल्वे क्षेत्रात येत नाही , गुजरात + फक्त पश्चिम रेल्वे म्हणजेच भारतीय रेल्वे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version