Home टॉप स्टोरी कोल्हापूरच्या महापौर अँटी करप्शनच्या जाळयात

कोल्हापूरच्या महापौर अँटी करप्शनच्या जाळयात

1

कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात शुक्रवारी त्यांच्या कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. 

कोल्हापूर – कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात शुक्रवारी त्यांच्या कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माळवी यांची चौकशी केली.

माळवी यांच्यावर आपल्या खासगी स्वीय सहायका मार्फत लाच मागितल्याचा आरोप आहे. महापालिकेने ताब्यात घेतलेली जमीन परत करण्यासाठी ही लाच मागितली होती. शिवाजी पेठेत रहाणा-या संतोष पाटील यांची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती.

ही जमीन परत मिळवण्यासाठी महापौरांची स्वाक्षरी आवश्यक होती. ही स्वाक्षरी करण्यासाठी माळवी यांनी आपले खासगी स्वीय सहायक अश्विन गडकरी यांच्या मार्फत चाळीस हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. अखेर संतोष पाटील सोळा हजार रुपये देण्यास तयार झाले.

त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तृप्ती माळवी आणि त्यांचे पीए अश्विन गडकरी यांना ताब्यात घेतले. ऑगस्ट २०१४ मध्ये तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा कार्यभार संभाळला होता. कोल्हापूरच्या त्या ४१ व्या महापौर आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version