Home एक्सक्लूसीव्ह खड्डयांना कारण असे की..

खड्डयांना कारण असे की..

1

मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे बुजवूनदेखील खडखडाट कायम असल्याचे रहस्य अखेर उलगडले. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले असताना या खड्डय़ांच्या देखभालीची जबाबदारी नवशिक्या अभियंत्यांवर सोपवण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.
मुंबई – मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे बुजवूनदेखील खडखडाट कायम असल्याचे रहस्य अखेर उलगडले. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले असताना या खड्डय़ांच्या देखभालीची जबाबदारी नवशिक्या अभियंत्यांवर सोपवण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.

खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिलेले अभियंत्यांना कामाचा अनुभव नाही. तसेच हे अभियंते मुंबई बाहेरचे असल्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण मिळालेले नाही. मुंबईतील कंत्राटदारांच्या दबावाला हे अभियंते बळी पडत असल्याने त्यांच्याकडून निष्काळजीपणे कामकाज होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. योग्यप्रकारे देखभाल केली जात नसल्यामुळेच रस्ते तसेच खड्डय़ांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट मत, स्टँक समितीचे अध्यक्ष एन. व्ही. मिराणी यांनी मांडले होते.

प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच खड्डय़ांची समस्या जटिल होत चालली आहे. महापालिकेकडून गेल्या तीन वर्षापासून अभियंत्यांची भरती केली जात आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण सुरू असतानाच त्यांची नियुक्ती केली गेली.

आतापर्यंत तब्बल ६०० हून अधिक अभियंत्यांची नियुक्ती झाली. त्यापैकी तब्बल १०० हून अधिक अभियंत्यांना दुय्यम अभियंता म्हणून थेट रस्त्यांच्या कामावर देखरेखीसाठी नियुक्त केले. महापालिकेत नियुक्त होणा-या अभियंत्यांना योग्य प्रशिक्षण तसेच येथील भौगोलिक परिस्थितीची माहिती होणे आवश्यक असते, असे रस्ते विभागाच्या तज्ज्ञांचे मत आहे. मात्र यातील कोणताही निकष पूर्ण केला जात नाही.

मुंबईतील सर्व रस्त्यांची जबाबदारी घेण्यास महापालिकेची तयारी
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांवरून महापालिका आणि इतर प्राधिकरणांवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु यापुढे यातून मार्ग काढत सर्व रस्ते महापालिकेच्या एकछत्री कारभाराखाली द्यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे हे सरकारकडे करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महापालिका प्रशासनाने तसा विचारही केला असून तसे सरकारला कळविले जाणार आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्यामुळे याबाबत प्रशासनाच्या अधिका-यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी याला दुजोरा देत सर्वच रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले.

अभियंत्यांना योग्य प्रशिक्षण न दिल्याने तसेच मुंबईची माहिती नसल्याने असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ते विभागाच्या अभियंत्याला १० ते १२ किलोमीटरच्या रस्त्याची जबाबदारी दिली आहे. मात्र एवढय़ा अंतराची देखभाल करण्यासाठी त्यांना वाहनाचीही व्यवस्था पुरवण्यात आली नाही.
– लक्ष्मण व्हटकर, अभियांत्रिकी संचालक

[poll id=”360″]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version