Home महामुंबई गिरणी कामगार-घराची लॉटरी २२ एप्रिलला

गिरणी कामगार-घराची लॉटरी २२ एप्रिलला

36

हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत असणा-या गिरणी कामगारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 

मुंबई- हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत असणा-या गिरणी कामगारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गिरणी कामगारांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. म्हाडाद्वारे काढण्यात येणारी दुस-या टप्प्यातील सोडतीची जाहिरात २२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

सोडत प्रक्रियेचा सविस्तर आराखडा, गिरण्यांची माहिती, वेळापत्रक आदी माहितीसह जाहिरात निघणार आहे. जाहिरात निघण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने कामगारांच्या सोडतीचे नियोजन करण्यासाठी अधिका-यांचे बैठक सत्रच सुरू आहे.

२०१२मध्ये काढण्यात आलेल्या कामगारांच्या सोडतीनंतर या वर्षी दुसरी सोडत काढली जाणार आहे. यंदाच्या सोडतीतील घरांची किंमत ९ लाख ५० हजार निश्चित करण्यात आली आहे. म्हाडाद्वारे सहा गिरण्यांच्या जागेवरील २ हजार ६३४ घरांसाठीची सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत १८ ते १९ हजार कामगारांमधून काढली जाईल.

सोडत प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण प्रक्रियेकरिता वेळापत्रक ठरवणे, सोडतीची तारीख निश्चित करणे याबाबत वरिष्ठ अधिका-यांची लगबग सुरू आहे. गिरण्यांचे कोड क्रमांक, अर्जदारांची नावे, पत्ते या सगळ्याचे नियोजन वेगाने सुरू आहे.

कामगारांच्या नावांमध्ये, मिलच्या नावामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्याची संधीही कामगारांना मिळणार आहे. जाहिरात निघाल्यानंतर कामगारांना चुका दुरुस्तीसाठीचे अर्ज उपलब्ध केले जाणार असून दिलेल्या कालावधीत कामगारांनी चुका दुरुस्त करणे अपेक्षित आहे.

36 COMMENTS

  1. गोकुळदास मोरजी मिल नंबर १ मधील कामगारांची lottery आणि प्रतीक्षा यादी केव्हा निघणार

    • काय खर नाही सरकारचे ,अजून कोहिनूर मिल नो १ आणि २ मिल च्या जागा पण नाही म्हाडा कडे जमा केल्या आहेत ntc ने…..

  2. मफतलाल मिलची सोडत कधी काढणार? अजून किती वर्ष वाट बघायची आम्ही मिल कामगारांनी. अजून मफतलाल मिलची एकपण सोडत नाही काढली.

  3. Mafatlal mil ki lottery kab tak hogi ? sab kamgar wait kar rahe hai ? mill stop hoke 16 year hua ? unit no 2 n. m. joshi marg tower ban gaye . lekin kamgar ko abhi tak ghar mila nahin?

    • कामला मिल कामगाराची घराची ची सोडत कधी निघणार याची माहीत देण्यात यावी

  4. NTC मिल कामगारांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे ते पण कमी किमतीत म्हनजे ७ लाखात या त्याहून हि कमी किमतीत

  5. पारस नाथ सिंग
    एलेफिंन्स्टन मिल वाल्यांना कधी मिळणार आहे. आता किती वर्ष झाली.. किती वाट पहायची…

  6. हिंदुस्थान मिल उनीत बी यांचा घराचा अनाउन्समेंट कधी होणार. तिथे आता मोठा टॉवर बनलेला आहे पण मिल कामगारांना आतापर्यंत घर मिळाला नाही. कधी मिळणार आहे….

  7. हिंदुस्थान मिल : आता मोठा टॉवर बनलेला आहे पण मिल कामगारांना आतापर्यंत घर मिळाल नाही. कधी मिळणार कामगारांच्या हक्काचं घर …………………..

  8. व्हिक्टोरिया मिल्स गिरणी कामगांरांना अर्ज भरण्यासाठी केव्हा मुदत मिळणार.

    • व्हिक्टोरिया मिल्स गिरणी कामगांरांना अर्ज भरण्यासाठी केव्हा मुदत मिळणार.

  9. गोकुळदास मोरजी मिल नंबर 2 मधील कामगारांची lottery आणि प्रतीक्षा यादी केव्हा निघणार

  10. गोकुळदास मोरजी मिल नंबर १ मधील कामगारांची lottery आणि प्रतीक्षा यादी केव्हा निघणार

  11. कमला मिल च्या जागा ताब्यात केव्हा येणार आणि ते आम्हाला केव्हा मिळणार आणि कुठे कारण आम्हाला परेल ला असणारी कमला मिलच्या जागेवरच घर मिळालं पाहिजे

  12. स्वदेशी मिल कामगारांचे काय ? कामगारांना घरे कधी मिळणार ? भाजप सरकार कडून खूप अपेक्षा आहेत आम्हा कामगारांना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version