Home महामुंबई चार वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अडीच लाख जखमी

चार वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अडीच लाख जखमी

1

भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांची पाठच धरल्याचे गेल्या चार वर्षातील आकडेवारीने उघड झाले आहे.

मुंबई – भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांची पाठच धरल्याचे गेल्या चार वर्षातील आकडेवारीने उघड झाले आहे. या काळात दोन लाख ७५ हजार ६३२ जणांना कुत्रे चावले असून त्यात ६७ जणांना प्राण गमवावे लागले. रस्त्यावर कुत्रे दिसल्यास मुंबईकरांना आता धडकीच भरत असल्याचे दिसून आले आहे.

[poll id=”978″]

रात्री-अपरात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. गोरेगावच्या नागरी निवारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने याची जोरदार चर्चा झाली. भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. मात्र काही खासगी संस्थांच्या प्राणी प्रेमामुळे भटक्या कुत्र्यांना मारण्यावर बंदी आहे. यामुळे सर्वसामान्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. विशेष करून लहान मुले भटक्या कुत्र्यांचे सहज लक्ष्य ठरू लागली आहेत.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या असंख्य तक्रारी महापालिकेकडे येतात. परंतु, अशा कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी गेल्यास प्राणी प्रेमींच्या दोषाला सामोरे जावे लागते. मुख्य म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी पालिकेकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्र्याला पकडून त्याची नसबंदी केल्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा पर्याय नाही.

साकीनाका, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोरेगाव, मालाड आदी अशा ठिकाणी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांसह मोठय़ांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. कुत्र्यांची नसबंदी करून त्याला आहे त्याच ठिकाणी सोडणे हा पर्याय नसून त्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत मुंबईकरांनी व्यक्त केले.

कुत्रे चावण्याच्या घटना व जखमींची संख्या
वर्ष    जखमींचीसंख्या
२०११    ८० हजार ८८९
२०१२    ८२ हजार २४७
२०१३    ८१ हजार ७१६
२०१४    ३० हजार ७५३

1 COMMENT

  1. भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्या साठी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची कत्तल करावी. जिथे कुत्र्यांचा मौंस खाल्ला जातो अश्या देशात तो निर्यात करावा. कुत्रांच्या कातडी पासून वस्तू बनवणे शक्य आहे. बाकी अवयव शेतीला खत म्हणून वापरता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version