Home महामुंबई चेंबूरमध्ये महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

चेंबूरमध्ये महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

1

चेंबूरमधील वाशी नाका परिसरात एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई- चेंबूरमधील वाशी नाका परिसरात एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही महिला या मुलावर लैंगिक अत्याचार करत होती. आरोपी महिला ही एकटीच राहते. तिने या पूर्वी याच पोलीस ठाण्यात आपल्या पती विरुध्द बलात्काराची तक्रार दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा १५ वर्षाचा असून तो या विकृत महिलेच्या मुलाचा मित्र आहे. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी ओळख होती. एक दिवस हा मुलगा मित्राच्या घरी गेला असता मित्राच्या आईने त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि त्याच्या सोबत अश्लील चाळे केले. हे सर्व तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन त्याची ‘व्हिडिओ क्लीप’ तयार केली.

हा मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याला मोबाईलमधील ‘व्हिडिओ क्लीप’ दाखविली आणि कोणाला सांगितले तर मी पोलिसात तक्रार देईन, अशी धमकी दिली. यानंतर हा प्रकार गेले दोन ते तीन महिने सुरू होता.

अखेर सदर प्रकार घाबरत घाबरत या मुलाने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी बाल अत्याचार कायद्याखाली सदर महिलेस अटक केली आहे. बाल लैंगिक अत्याचार कायदा अस्तित्वात आल्यानंतरचा हा पहिलाच गुन्हा आहे. विशेष म्हणजे यात चक्क महिला आरोपी आहे.

1 COMMENT

  1. हे हिम नगाचे टोक आहे.वय वाढलेल्या मुली १५ वर्षाच्या वयात आलेल्या मुलांबरोबर लेय्न्गिक चाले करून करून त्यांना स्त्रियान कडून मिळणाऱ्या सुखाची जाणीव करून देतात.असि मुल नंतर.कमी वयाच्या मुलीन कडून स्त्र्यी सुख मिळव ण्याचा प्रयत्न करतात.उघड झाले तर तो बलात्कार ठरतो.nahitar कमी वयात पुरुष सुखाचा अनुभव घेतलेल्या मुली मोठ्या झाल्या नंतर १५ वर्षाच्या वयात आलेल्या मुलांबरोबर ल्यागिक चाले करून पुरुष सुख मिळवण्याचा प्रयतन करतात.भारतीय समाजाचे अधो गतीचे मुल कारण हे आहे १३ व्या वर्षाला लगन झालेल्या मुलीना त्यांचा हक्काचे पुरुष सुख त्यांना मिळत असते.म्हणून त्या वाय्भिचार करत नाहीत.हे सत्य भारतीयांना समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version