Home महामुंबई छगन भुजबळ यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल

छगन भुजबळ यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल

1

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व मनी लॉण्डरिंगप्रकरणी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी सकाळी सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई- दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व मनी लॉण्डरिंगप्रकरणी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी सकाळी सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या भुजबळ यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे, भुजबळांच्या प्रकृतीसंदर्भात अद्याप काहीच सांगू शकत नाही, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून भुजबळ यांची प्रकृती ठिक नव्हती. आर्थर रोड तुरूंगातील डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण सोमवारी सकाळी १० वाजता तब्येत खूपच खालावल्याने त्यांना आर्थर रोड तुरूंगातून सेंट जॉर्जेस रुग्णालयात आणण्यात आले.

रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या दातातही प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे सुरूवातीला भुजबळ यांना सेंट जॉर्जेस येथील दंत रुग्णालयात पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान छातीत कळा येऊ लागल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.

प्राथमिक वैद्यकीय तपासणीत भुजबळ यांचा रक्तदाब १८०-१०० इतका झाला होता. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांना चक्कर येत होती. ते उभे सुद्धा राहू शकत नव्हते.

दम्याच्या त्रासही त्यांना जाणवत होता. भुजबळ यांचा ईसीजी काढला असून रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या चाचण्याही केल्या आहेत. या सर्व चाचण्यांच्या अहवाल प्राप्त होण्याची आम्ही वाट पाहत आहोत.

कारण, अहवाल पाहिल्याशिवाय काहीच सांगू शकत नाही. सध्या भुजबळ यांची प्रकृती गंभीर असून स्थिर आहे, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. रोहन सिक्वेरा यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. अहो ८०० कोटींची माया जमविताना प्रकृती एकदम ठणठनीत होती ना? आता कसली धाड भरली ओ साहेब?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version