Home महामुंबई ठाणे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय नव्या रूपात!

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय नव्या रूपात!

1

ठाणे शहरातील मनोरुग्णालयाजवळील जागेत विस्तारित रेल्वे टर्मिनलचा प्रकल्प मागे पडला असून तेथे जिल्हा सामान्य रुग्णालय बांधण्यात येणार आहे. 

ठाणे- शहरातील मनोरुग्णालयाजवळील जागेत विस्तारित रेल्वे टर्मिनलचा प्रकल्प मागे पडला असून तेथे जिल्हा सामान्य रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या सात मजली रुग्णालयाच्या इमारतीत ५०० बेडस् उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय शहराच्या मध्यभागी असून या रुग्णालयाची वास्तू जीर्ण झालेली आहे. हे रुग्णालय मोठ्या जागेत हलवून तेथे रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. तसा ठराव करून सरकारदरबारी पाठवण्यात आला होता. जागेच्या पाहणीसाठी मनोरुग्णालयाजवळील पाच ते दहा एकर जागा होऊ शक ते. यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी तेथे कंपाउंड बांधण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडण्याच्या सूचना स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आल्या होत्या. पण शहरातील इतक्या मोठ्या रुग्णालयाचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी शहराच्या जवळ जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे रुग्णालयाचे स्थलांतर होत नव्हते. मात्र आता मनोरुग्णालयाजवळील पाच ते दहा एकर जागेत १०० कोटी रुपये खर्च करून सात मजली रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयात ५०० बेडस् उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयच्या जुन्या इमारतीत महिलांसाठी २०० व बालकांसाठी १०० असे ३०० बेड्चे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

टर्मिनस बारगळले

ठाणे रेल्वे स्थानकाचा वाढता भार लक्षात घेता मनोरुग्णालयाजवळच्या मोकळ्या भूखंडावर टर्मिनस करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. ही जागा सरकारच्या अखत्यारित असल्याने या संदर्भात पाठपुरावा करून ही जागा मिळवण्यास पालिका अपयशी ठरल्याने टर्मिनसचा प्रस्ताव बारगळला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version