Home महामुंबई ठाणे डोंबिवलीत पेट्रोलपंप लुटण्याचा प्रयत्न फसला

डोंबिवलीत पेट्रोलपंप लुटण्याचा प्रयत्न फसला

1

सात लाख रुपयांची रोकड घेऊन जात असलेल्या कल्याण-शिळ रस्त्यावरील शहीद अरुण चित्ते पेट्रोल पंप चालकांवर अचानक झडप घालून त्यांना चॉपरचा धाक दाखवून पैसे पळवण्याचा चोरटयाचा प्रयत्न फसला.

डोंबिवली – सात लाख रुपयांची रोकड घेऊन जात असलेल्या कल्याण-शिळ रस्त्यावरील शहीद अरुण चित्ते पेट्रोल पंप चालकांवर अचानक झडप घालून त्यांना चॉपरचा धाक दाखवून पैसे पळवण्याचा चोरटयाचा प्रयत्न फसला. फिल्मिस्टाइल रंगलेल्या या थरारात पेट्रोल पंपावर काम करणा-या एका कर्मचा-यांने मोठे धाडस दाखवून या चोरटयाला पिटाळले. इतकेच नाही तर नागरिकांच्या मदतीने त्यांना जेरबंदही केले.

सात लाख रुपये घेऊन जात असताना चोरटयांनी त्यांच्यावर चॉपरने वार करून रोकड हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न फसला आहे. या वेळी पंपावरील कर्मचा-याने सायकलीवरून चोरटय़ांचा पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने या चोरटयाला पकडले. गुरुवारी भरदिवसा डोंबिवली परिसरात घडलेल्या या प्रकारात अस्लम कुरेशी या लुटारूला अटक करण्यात आली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अरुण चित्ते यांच्या पत्नीला शासनाने हा पेट्रोल पंप दिला आहे. हा पेट्रोल पंप चित्ते यांचे सासरे रंगनाथ सोनावणे चालवतात.

पेट्रोलपंपापासून काही अंतरावर सोनावणे राहतात. सकाळच्या सुमारास सोनावणे सात लाखांची रोकड घेऊन पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते. त्या वेळी दबा धरून बसलेल्या अस्लमने पेट्रोल पंपाजवळच त्यांची वाट अडवीत त्यांच्यावर चॉपरने वार केले. त्या वेळी चोरटयाच्या हातातील रोकड असलेली पिशवी घेऊन पळून जात असतानाच पेट्रोल पंपावरील कर्मचारी भोलू तिवारीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने जवळ असलेली सायकल घेऊन चोरटयाचा पाठलाग केला. या वेळी अस्लमने भोलूच्या दिशेने गोळीबारही केला मात्र तो बचावला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version