Home महाराष्ट्र कोकण डोळ्यांदेखत उभा संसार जळून खाक झाला

डोळ्यांदेखत उभा संसार जळून खाक झाला

1

मुलाच्या लग्नासाठी पै पै करून जमा करून ठेवलेली सर्व पुंजी, कपडेलत्ते घरातील सर्व धान्य व भांडय़ांसह अख्खा संसार डोळ्यादेखत जळून खाक होताना पाहून त्या कुटुंबावर जणू पहाड कोसळला.

सावंतवाडी- मुलाच्या लग्नासाठी पै पै करून जमा करून ठेवलेली सर्व पुंजी, कपडेलत्ते घरातील सर्व धान्य व भांडय़ांसह अख्खा संसार डोळ्यादेखत जळून खाक होताना पाहून त्या कुटुंबावर जणू पहाड कोसळला.

राहती झोपडी जळून खाक झाल्याने संसार उघड्यावर आला. सावंतवाडी शहरालगत असलेल्या कारिवडे-पेडवेवाडी येथे मंगळवारी पहाटे ५ वा. हृदयद्रावक घटना घडली.

उघड्य़ावर आलेल्या या कुटुंबाला समाजातील दानशुरांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

पेडवेवाडी हळदीचा कन्हा येथे गेली १० ते १५ वर्षे कृष्णाप्पा पराड व त्यांचे कुटुंब झोपडीत रहात असत. येथून लगतच असलेल्या एका क्रशरवर ते दगड फोडण्याचे काम करत असत.

दोन मुलगे, दोन मुली व पत्नी यांच्यासह त्यांचा सुखाचा संसार चालु होता. त्यांच्या मंजूनाथ या मुलाचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. त्यासाठी चार दिवसांनी ते बेळगाव येथे खरेदीसाठी जाणार होते. यासाठी त्यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून मोठी पुंजी जमा केली होती. मात्र मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत सा-याचीच राखरांगोळी झाली.

मंगळवारी पहाटे आपल्या मुलांसह कामाला जाण्यासाठी आवरा आवरा करत होते. त्याचवेळी त्यांची भाजी भाकरी देण्यासाठी त्यांच्या पत्नीने चुलीवर आंदन ठेवले व पाणी आणण्यासाठी झोपडी मागे गेली. मागे येऊन पाहते तर काही क्षणार्धात झोपडी जळून खाक झाली होती. लग्नासाठी ठेवलेले रोख १० हजार रूपये, तांदुळ, गहू, ज्वारी यासह आठवडय़ाचा किराणा, भांडी, कपडेलत्ते, मुलांची शाळेची दप्तरे, वह्या, पुस्तके, पास, आधार कार्ड यांसह सर्व कागदपत्रे व दस्तऐवजही आगीत खाक झाले. झोपडी बरोबरच त्यांनी मुलाच्या लग्नाची रंगवलेल्या सुखद स्वप्नांचीही अक्षरश: राखरांगोळी झाली.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सारेच होत्याचे नव्हते झाले होते. या अग्नितांडवात वडार यांचा अख्खा संसार उघडय़ावर आला आहे. सुदैवाने आग लागली त्यावेळी झोपडीत कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. उघडय़ावर आलेल्या या कुटुंबाला समाजातील दानशुर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चारूदत्त गावडे यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version