Home टॉप स्टोरी पुनर्वसनासाठी नेपाळला एक अब्ज डॉलरची मदत

पुनर्वसनासाठी नेपाळला एक अब्ज डॉलरची मदत

1

शक्तिशाली भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळला भारताने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.

काठमांडू – शक्तिशाली भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळला भारताने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. नेपाळच्या पूर्नवसनासाठी भारताकडून एक अब्ज डॉलर मदतीची घोषणा केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी केली.

नेपाळ सरकारकडून काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान स्वराज यांनी ही घोषणा केली. सुषमा स्वराज दोन दिवसांच्या नेपाळ दौ-यावर आहेत.

बुधवारी स्वराज यांनी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांची भेट घेतली. यावेळी भूकंपातून सावरण्यासाठी तसेच पुर्नवसनासाठी नेपाळला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

२५ एप्रिलला आलेल्या विनाशकारी भूकंपाने संपूर्ण नेपाळला हादरवून सोडले. या भूकंपात तब्बल नऊ हजार लोकांचा बळी गेला तर हजारो जण जखमी झाले. अद्यापही नेपाळला भूकंपाचे लहान धक्के वारंवार जाणवत आहेत. या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जनजीवन उद्ध्वस्त झालेच मात्र वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली.

1 COMMENT

  1. एक अब्ज डॉलर्स म्हणजे त्रेसस्थ ( ६३.६३०२६ ) अब्ज भारतीय रुपये ,वा ! सुषमा जीन्की जय हो ! मेरा भारत महान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version