Home ताज्या घडामोडी प्रकाश राज यांची मोदींवर बोचरी टीका

प्रकाश राज यांची मोदींवर बोचरी टीका

1

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकातील राजकीय नाट्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे.

नवी दिल्ली- कर्नाटकातील भाजपचे सरकार अवघ्या दोन दिवसांत कोसळल्यानंतर सोशल मीडियातून भाजपवर टीकेचा भडिमार होतो आहे. भाजपविरोधी विचारांचे सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकातील राजकीय नाट्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. ५६ इंचाच्या छातीचा अभिमान बाळगणा-या मोदींना ५५ तासही कर्नाटक सांभाळता आले नाही, अशी बोचरी टीका प्रकाश राज यांनी केली आहे.

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या. मात्र, बहुमताने भाजपला हुलकावणी दिली. असे असतानाही सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगत भाजपने सत्तेवर दावा केला. मात्र, बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवता न आल्याने भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दोनच दिवसांत राजीनामा द्यावा लागला. या घडामोडींचा संदर्भ देत प्रकाश राज यांनी एक ट्विट केले आहे.

कर्नाटकचा रंग भगवा होणार नाही. तो रंगीबेरंगीच राहणार आहे. सामना सुरू होण्याआधीच संपला आहे. छप्पन्नचं काय घेऊन बसलात, ५५ तासही त्यांना कर्नाटक राखता आलेले नाही, असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील नागरिकांना आता पुढील गलिच्छ राजकारणासाठी तयार राहावे लागेल, असे सांगतानाच, मी यापुढेही जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहीन आणि प्रश्न विचारत राहीन, असेही त्यांनी नमूद केले आहे.

1 COMMENT

  1. हा अकलेचा “प्रकाश” पाडणारा करंटा हे लिहीत असताना 56 इंच छातीचा राजकारणी जम्मू काश्मीरमध्ये जनतेसाठी शांतता आणि सैनिकाना प्रोत्साहन देऊन फुटीरवाद्याना नामोहरम करीत आहे. राजीनाम्यामागे काय खरे नाटक आहे हे पैशासाठी खोटा अभिनय करणारया फक्त नावात राज असणारयास काय ठाऊक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version