Home टॉप स्टोरी ‘प्रहार स्मार्ट कीज्’चे लोकार्पण

‘प्रहार स्मार्ट कीज्’चे लोकार्पण

1

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या संगणकावर मराठी भाषा असावी यासाठी ‘प्रहार स्मार्ट कीज्’ बहुमोल मदत करील, असा आशावाद ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी व्यक्त केला.
मुंबई- महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या संगणकावर मराठी भाषा असावी यासाठी ‘प्रहार स्मार्ट कीज्’ बहुमोल मदत करील, असा आशावाद ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला. संगणक आणि इंटरनेटवर मराठी भाषा लिहिण्यासाठी उपयुक्त अशा ‘प्रहार स्मार्ट कीज्’ लोकार्पण समारंभात ते बोलत होते. आपण आपल्या मातृभाषेबद्दल आग्रही असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

या लोकार्पण समारंभास सौ. निलमताई राणे, युवा नेते व ‘स्वाभिमान’चे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे, ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे, महाव्यवस्थापक मनीष राणे, वरिष्ठ राजकीय वार्ताहर शामसुंदर सोन्नर, वेब आवृत्तीप्रमुख जयकृष्ण नायर, आयटी विभागप्रमुख प्रमोद गणेशे, ‘स्मार्ट सोल्युशन्स’चे श्रीधर मदुराई आणि श्रीधर म्हैसूर आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या नव्या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये संपादक महेश म्हात्रे यांनी प्रास्ताविकात सांगितली. ‘प्रहार’ आणि ठाण्यातील ‘स्मार्ट सोल्युशन्स’ने एकत्र येऊन तयार करण्यात आलेल्या ‘प्रहार स्मार्ट कीज्’मध्ये अक्षरानुसार शब्दपर्याय सुचवणारा (इंटरनेटशिवाय प्रिडिक्टिव टायपिंग) पर्याय देण्यात आला आहे. मराठी टंकलेखनामध्ये अशा प्रकारची सुविधा प्रथमच एका सॉफ्टवेअरमध्ये देण्यात आली आहे, अशी माहिती म्हात्रे यांनी दिली. नव्याने संगणकसाक्षर झालेल्या लोकांसाठी या सॉफ्टवेअरचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

संक्रांतीनिमित्त ‘प्रहार’ने वाचकांना ही खास भेट दिली आहे. दोन कळफलक, दोन मराठी युनिकोड फाँट, मराठी शब्दकोष, सर्व विंडो ऑपरेटिंग सिस्टममध्ये सहजतेने वापर या वैशिष्टयांसह ‘प्रहार स्मार्ट किज्’ मोफत डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version