Home महामुंबई ठाणे प्राचीचे डोळे इतरांना जग दाखविणार

प्राचीचे डोळे इतरांना जग दाखविणार

0

ठाणे – ठाण्यातील प्राची झाडे या तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्यानंतर प्राचीच्या पालकांनी तिचे डोळे दान केले आहेत. आपल्या जिवंतपणी स्वत:ची स्वप्नं तिने पूर्ण होताना पाहिली नाहीत. मात्र, मृत्यूपश्चात प्राचीचे डोळे आता इतर दोघांना जग दाखवू शकणार आहेत. प्राचीच्या पालकांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्यांच्या मनाचा मोठेपणा समोर आला आहे.

भिवंडी, काल्हेर येथील आरोपी आकाश पवार (२५) याने एकतर्फी प्रेमातून कोपरी येथील प्राची झाडे (२१) या तरुणीचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या केली. आरोपीला या प्रकरणी रविवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता, त्याला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राचीचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर प्राचीच्या पालकांनी दाखविलेल्या इच्छेनुसार प्राचीचे नेत्रदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या नेत्रदानाचा फायदा एक ते दोन जणांना होणार असून हे जग त्यांना प्राचीच्या डोळ्यातून पाहायला मिळणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version