Home एक्सक्लूसीव्ह बातम्या फुटू नयेत म्हणून केईएमच्या डॉक्टरांना तंबी!

बातम्या फुटू नयेत म्हणून केईएमच्या डॉक्टरांना तंबी!

1

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर आलेल्या केईएमच्या अस्वच्छतेमुळे यापुढे आणखी काही बातम्या फुटून केईएमची नस्ती नालस्ती होऊ नये, म्हणून केईएमने आपल्या आवाराला ‘तटबंदी’ घातली आहे.
मुंबई- तुम्ही केईएममध्ये जाणार असाल तर सावधान! आम्ही डेंग्यूपासून घ्यायची काळजी म्हणून नाही सांगत, तर डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर आलेल्या केईएमच्या अस्वच्छतेमुळे यापुढे आणखी काही बातम्या फुटून केईएमची नस्ती नालस्ती होऊ नये, म्हणून केईएमने आपल्या आवाराला ‘तटबंदी’ घातली आहे.

त्यामुळे तुम्ही आता केईएममध्ये जाणार असाल तर तुमच्यावर या कर्मचा-यांच्या प्रश्नांची सरबत्ती होऊ शकते. आणि त्यानंतरच ही तटबंदी भेदून तुम्हा आत प्रवेश करू शकता. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर होणारी रुग्णालयाची बदनामी टाळण्यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना सक्त ताकीद देण्यात आली असून, डेंग्यूची बातमी ज्या विभागातून फुटेल, त्या विभागप्रमुखांना नोटिसा काढण्याचे आदेश केईएमच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी दिले आहेत.

केईएममधील १० डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली. पैकी दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला, तर डेंग्यूवर उपचार घेण्यासाठी आलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनाक्रमानंतर अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी अंतर्गत बैठक बोलावून रुग्णालयातील सुरक्षा वाढवण्यावर भर दिल्याचे समजते.
यात अतिदक्षता विभागापासून सामान्य वॉर्डात विनाकारण घुटमळणा-यांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आल्याचे माहीतगारांकडून समजते. शिवाय डेंग्यूबाबत कोणीही बाहेर वाच्यता करू नये, असा आदेशही दिला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version