Home महामुंबई भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर कोटय़वधींचा खर्च

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर कोटय़वधींचा खर्च

1

मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम हाती घेणा-या महापालिकेचा खर्च आता कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. 

मुंबई- मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम हाती घेणा-या महापालिकेचा खर्च आता कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. मुंबईत १९९८पासून २०११पर्यंत २ कोटी ६४ लाखांच्या खर्चाला मान्यता घेत हाती घेतलेल्या या कार्यक्रमाला मार्च २०१७ पर्यंत पुढे चालू ठेवले जाणार आहे.

यासाठी तिस-यांदा खर्चात वाढ केली जात असून आतापर्यंत या नसबंदीवर सुमारे सात कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबईत सुमारे २५ हजार भटक्या कुत्र्यांची नोंद मागील वर्षी झालेली आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपयांच्या खर्चानंतरही नसबंदीचा प्रभाव होत नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याऐवजी त्यांची नसबंदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. कुत्र्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी नसबंदी कार्यक्रम हाती घेत ५ ऑक्टोबर १९९८ ते ३१ मार्च २०११ या कालावधीसाठी २ कोटी ६४ लाख ४७ हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. परंतु पुन्हा हेच कंत्राट दोन वर्षानी वाढवत मार्च २०१३पर्यंत नेले. त्यासाठी मग निधीत वाढ करून एकूण ४ कोटी १४ लाख ४७ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आता ३१ मार्च २०१७ पर्यंत हा नसबंदी कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २ कोटी ८१ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या प्राणी प्रजनन नियंत्रण (श्वान) नियम २००१ अन्वये भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करणे बंधनकारक आहे. जानेवारी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या श्वान गणनेनुसार मुंबईत १४ हजार ६७१ नर आणि ११ हजार २६२ मादी असल्याची नोंद झाली आहे. त्यांचे निर्बिजीकरण करणे आवश्यक असल्यामुळे कुत्र्यांच्या नसबंदीचा खर्च वाढल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिका १९९८ पासून प्रति कुत्रा ३०० ते ६०० रुपये देत आहे.

१६ वर्षाच्या कालावधीनंतर या दरात ६०० ते १२०० रुपये वाढ करण्याचे ठरवले आहे. त्या तुलनेत ठाणे महापालिकेने २०१३-१५ या कालावधीकरता प्रति कुत्र्याच्या नसबंदीसाठी १२५० रुपये एवढा दर निश्चित केला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला आहे.

1 COMMENT

  1. नसबंधी,निर्बिज्करण ,इत्यादींवर खर्च करण्यापेक्षा,सरळ सरळ गोळ्या घालून घाण कमी करा,किंवा,पकडून
    फीलीपेन (philipine ) या देशांत निर्यात ( Export ) करा.त्यांच्या जेवणाचा खर्च कमी होईल ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version