Home टॉप स्टोरी जातपंचायतीच्या आदेशावरुन महिलेची निर्वस्त्र धिंड

जातपंचायतीच्या आदेशावरुन महिलेची निर्वस्त्र धिंड

1

जात पंचायतीने दिलेल्या आदेशानंतर एका महिलेची गाढवावरुन  निर्वस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

जयपूर – जात पंचायतीने दिलेल्या आदेशानंतर एका महिलेची गाढवावरुन निर्वस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पिडीत महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना प्रकाशात आली. याप्रकरणी पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे.

दोन नोव्हेंबर रोजी राजसमंद जिल्ह्यातील थुरुवल गावात वर्दी सिंग या माणसाचा संशियितरित्या मृत्यू झाला होता. गावक-यांनी पोलिसांना कळवू न देता अंत्यविधी पार पाडल्याने हा मृत्यू कसा झाला याबाबतची कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मात्र वर्दी सिंगच्या पत्नीने पिडीत महिलेवर हत्येचा आरोप ठेवत पंचायतीसमोर हे प्रकरण आणले. या प्रकरणी पंचायतीच्या बैठकीत पिडीत महिलेनेच वर्दी सिंगची हत्या केल्याचे जाहीर करण्यात आले आणि तिच्या तोंडाला काळे फासून त्यानंतर तिला निर्वस्त्र करुन तिची गाढवावरुन धिंड काढण्याची धक्कादायक शिक्षा तिला देण्यात आली.

हा धक्कादायक प्रकार पिडीत महिलेच्या पतीला समजताच त्याने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही या घटनेची दखल घेत ३० जणांना या प्रकरणी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये नऊजण हे पिडीत महिलेच्या कुटुंबातील सदस्य आहेत. तसेच या घटनेनंतर गावातही पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version