Home महामुंबई मुंबईकरांच्या घरातल्या घागरी भरेनात

मुंबईकरांच्या घरातल्या घागरी भरेनात

1

मुंबईकरांना मुबलक पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असतानाच मागील दोन-तीन दिवसांपासून पाण्याची प्रचंड कमतरता भासू लागली आहे. 

मुंबई-  मुंबईकरांना मुबलक पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असतानाच मागील दोन-तीन दिवसांपासून माहीम, धारावी, माटुंगा, सांताक्रुझ आणि खार परिसरात पाण्याची प्रचंड कमतरता भासू लागली आहे.

या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील कुटुंबांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

मुंबईतील शहर आणि काही भागांमध्ये शनिवारपासून पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. पाणी मिळत नसल्यामुळे येथील लोकांकडून तक्रारींचा पाऊस नगरसेवकांवर बरसायला लागला असून प्रत्यक्षात नगरसेवकांच्या प्रयत्नांनाही यश येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे.

नगरसेवकांच्या प्रयत्नाने धारावीसह काही भागांमध्ये रविवारी टँकर मागवून पाण्याचा पुरवठा केला गेला. परंतु यानंतरही मुंबईकरांच्या घरातील घागरी उताणीच होत्या.

खार-सांताक्रुझ भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, ही बाब महापालिकेच्या अधिका-यांच्या दृष्टीस आणूनही देण्यात आली. परंतु सव्वा दोन पौंडाचा असलेला पाण्याचा प्रेशर आता केवळ दोनच्याही खाली आल्याचे निदर्शनास आले.

पण त्यानंतरही महापालिकेच्या अधिका-यांकडून ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे याचा निषेध म्हणून सोमवारी सकाळी नऊ वाजता सांताक्रुझ प्रभात कॉलनी येथील एच/पूर्व महापालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपाचे नगरसेवक महेश (कृष्णा) पारकर यांनी दिला आहे.

1 COMMENT

  1. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सारख्या विभागात प्रताप नगर ते रामवाडी अशा झोपडपट्टी विभागात सकाळी ४ ते ६.३० पर्यंत प्रचंड दाबाने पाणी सोडण्यात येते. तरीही तेथील नागरिक रात्री १२पर्यंत झोपी जात नसल्या कारणाने सकाळी पाणी येत असल्याने पाण्याचे पिंप भरण्याकरिता नळाला पाईप लावून झोपी जातात आणि नंतर पाहतात तर काय मोठे आश्चर्य? कि पाणी किमान अर्धा,एक तास,दीड तास गटाराच्या वाहिनीतून वाहून गेलेले असते. अशा वेळेस जर पालिकेने आक्षेप घेतला तर तेथील नगरसेवकांना/नगरसेविकांनाच तेथील जनता कारणे दाखवा नोटीसीबद्दल विचारातील. महिला स्त्रीवर्ग फक्त घरचीच कामे करणारी असतील किंवा ऑफिस करिता जाणाऱ्या असतील त्यांना सकाळी ४ वाजता उठून कामे करण्यास कोणतीच हरकत नाही कारण उर्वरित वेळ घराची कामे करणाऱ्या महिलांना झोप काढण्यास मुबलक प्रमाणात मिळतो. एखाद्यास त्रास देण्यास त्यांच्या दरवाज्यात रात्रीचे बारा वाजेपर्यंत धुमाकूळ घालायचा, पण पोलिस चौकीतील अधिकारी हि त्यांना कधीच पकडू शकत नाही आणि पाण्याच्या वेळेत पाणी न भरता उलट सर्व खापर नगरसेवकावर/नगरसेविकेवर टाकायचे. उलट नगरसेवकांनी/ नगरसेविकेने ठेवलेली सकाळी ४ वाजताची पाण्याची वेळ योग्य आहे, हि पाण्याची वेळ बदलण्याकरिता तर तेथील महिला वर्ग हे सर्व नाटक तर करीत नसेल ना? उलट सकाळी ४ वाजता पाणी भरून आपल्या मुलांना शाळेत सोडताना, पतीस जेवण करून देऊन कामावर पाठवण्याकरिता नगरसेवकांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे असे तेथील कित्येक जनतेस वाटते. अशा नगरसेवक/ नगरसेविकेचे तेथील जनता आभार मनातील. नाहीतर माहीम, धारावी, माटुंगा, सांताक्रुझ आणि खार परिसरातील लोकांप्रमाणे उद्या तेथील जनतेस हि सर्व खापर नगरसेवकावर/ नगरसेविकेवर टाकण्यास त्यांना वेळ लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version