Home देश ..म्हणून रजनीकांत वाढदिवस साजरा करणार नाही

..म्हणून रजनीकांत वाढदिवस साजरा करणार नाही

1

तामिळनाडूमध्ये झालेल्या पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुपरस्टार रजनीकांत आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत.

चेन्नई- तामिळनाडूमध्ये झालेल्या पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुपरस्टार रजनीकांत आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे.

गेल्या कादी दिवसांपासून तामिळनाडूत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता तामिळनाडू पूर्वपदावर येत आहे. तेथील नागरिकांना मानसिक आधाराची गरज आहे. वाढदिवस साजरा करण्याऐवजी पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन रजनीकांत यांनी केले आहे.

रजनीकांतच्या वाढदिवसाच्या दिवशी एनथिरन दोन चित्रपटाची घोषणा करण्यात येणार होती, मात्र आता ही घोषणाही पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी तामिळनाडूमध्ये मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version