Home टॉप स्टोरी अधिका-यावर गोळया झाडून वाकोला पोलिस स्थानकात पोलिसाची आत्महत्या

अधिका-यावर गोळया झाडून वाकोला पोलिस स्थानकात पोलिसाची आत्महत्या

1
संग्रहित छायाचित्र

पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या एस. आय. शिर्के या अधिका-याने शनिवारी रात्री पोलिस ठाण्यातच वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळीबार केला.

संग्रहित छायाचित्र

मुंबई – सुट्टयांच्या वादातून वाकोला पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या एस. आय. शिर्के या अधिका-याने शनिवारी रात्री पोलिस ठाण्यातच वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात विलास जोशी यांच्यासह पोलिस उपनिक्षक अहिरे हे दोघे गंभीर रित्या जखमी झाले असून या गोळीबारानंतर सहायक पोलिस निरीक्षक शिर्के यांनी त्याच रिव्हॉलवरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली यात त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान वाकोला पोलिस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. जखमी झालेल्या विलास जोशी आणि अहिरे यांना तातडीने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यता आले आहे. विलास जोशी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version