Home महामुंबई सांडपाणी प्रकल्पाद्वारे पाणी बचतीचा मंत्र!

सांडपाणी प्रकल्पाद्वारे पाणी बचतीचा मंत्र!

1

मुंबईत पाण्याची बचत करण्याचे आवाहन करत सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा वापर शौचालयांमध्ये फ्लशिंग व उद्यानांत वापरण्यास सांगितले जाते. 

मुंबई – मुंबईत पाण्याची बचत करण्याचे आवाहन करत सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा वापर शौचालयांमध्ये फ्लशिंग व उद्यानांत वापरण्यास सांगितले जाते. काही गृहनिर्माण संकुलांत अशाप्रकारे सांडपाणी प्रकल्प उभारले असून ते नादुरुस्त झाल्यानंतर त्याचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे यांच्या दुरुस्तीचा खर्च नगरसेवक निधीतून करण्याची मागणी काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

मुंबईत पावसाचे पाणी साठवण्याचे योग्य नियोजन नसल्याने हजारो लिटर्स पाणी वाया जाते. त्यामुळे समाधानकारक पाऊस पडूनही संपूर्ण वर्षभर मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मुंबईत दररोज ३० टक्के वापर जेवणाकरता आणि ७० टक्के वापर नैसर्गिक विधी व इतर गोष्टीसाठी होतो.

त्यामुळे महापालिकेने अवाढव्य खर्च करून शहरात आणलेले पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जाते. त्यामुळे या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केद्रांची सुविधा महापालिकेकडून पुरवण्यात येते. परंतु काही कारणास्तव हे केंद्र नादुरुस्त झाल्यास पाण्याचा अपव्यय होतो. दहिसरमधील टिंबर ग्रीन पार्क येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र नादुरुस्त झाल्याने ते बंद आहे. त्यामुळे या परिसरातील इमारतीमागे दररोज ५० ते ६० हजार लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे केंद्र सुरळीत असते तर वाया जाणारे पाणी वाचवू शकलो असतो.

त्यामुळे मुंबईतील नादुरुस्त अवस्थेतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची नगरसेवक निधीतून दुरुस्ती करता यईल, अशा पद्धतीने नगरसेवक निधी वापरासंबंधी नियमावलीत सुधारणा करण्याची मागणी शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

1 COMMENT

  1. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड लगत कित्येक झोपडपट्ट्या आणि चाळी आहेत, सकाळी चार ते साडे सहा वाजण्यास हे पाणी पलिकेअन्तर्गत तेथील जनतेस फुल फोर्समध्ये सोडण्यात येते. परंतु कित्येक अशी घरे आहेत जी पाण्याचे नळ खुले सोडून पाणी रस्त्यावर किंवा गटारे आणि नाल्यातून वाया घालवतात. पण तेथील विभागाची स्वच्छता करण्यास त्यांच्याजवळ पाणी राहत नाही. गटारे,नाले पूर्णपणे प्याककरून ठेवल्याने जे पाणी गटारातून जायला हवे ते जवळील रस्त्यावर पसरते आणि प्रत्येक विभाग घाणीने माखला जातो. नुसते जोगेश्वरी नव्हे तर धारावी,कुर्ला,सायन अशा ठिकाणी हि असे गैरप्रकार करण्यात येतात. एखाद्याने या घटनेची वाच्चता साध्या नगरसेवकाकडे जरी केली तरी तेथील विभागातील राजकारणी कार्यकर्ते त्यावर पोलिसांना विश्वासातघेऊन प्राणघातक हल्ला करण्यास हि डगमगत नाही. पहाटेच्या पाणी सोडण्याच्या वेळेस “प्रहारच्या” संपादकाने तेथे जर पाहाणी केली किंवा त्याचे छायाचित्रण केले तर त्यांना सर्व हकीकत कळेल. परंतु तेथील विभागास किमान दोन दिवस पाणीपुरवठा करण्यास किंवा नळजोडणी मुळे उशीर झाला तर पाणी वाया घालवणारे तेच व्यक्ती तेथील रस्ता अडवण्यासारखे,पोलिसांशी उर्मट वागण्याचे प्रकार दिलखुलासपणे करतात,प्रत्येक गाड्यांना अडवण्याचे कामकरून ते तेथील कामाधन्द्यावाल्या जनतेचे कितपत नुकसान करतात याची साधी कल्पना तरी पोलिसांना आहे का? फक्त मिडियासमोर चमकण्याकरिता हा सर्व प्रकार चालतो. पाणी मिळत नाही याकरिता रस्ते आंदोलन करून काही पाणी मिळत नाही, तर ते आंदोलन करण्याआधी पालिका आयुक्तांना आणि पोलिसचौकीला निवेदन द्यावे लागते, तेव्हाच “जर आणि तर”च्या भाषणाने आंदोलन छेडावे लागते. पाण्याचे नुकसान म्हणजे “भू तलाचे” नुकसान हि सर्व साधारण गोष्ट प्रत्येक नागरिकास कळली पाहिजे. जे पाणी आपण वाया घालवतो ते काही सांडपाणी नाही, तेच पाणी आज बाजारात १ लिटरला किमान रु.२०/- प्रमाणे प्लास्टिक बाटलीत बंद करून विकले जाते. पाण्याचे बिल किमान ८ ते १० जण भरतात मग कोणीही कितीही पाणी वाया घालवो, हवे तर नळ चालू करून निश्चिंत झोपो फरक काय पडतो? यात ज्यास टाकीभरही पाणी मिळत नाही किंवा त्याकरिता तलवारी आणि चौपरचा सामना करावा लागतो,अशा लोकांचे किती हाल होतात,याकडे पोलिस लक्ष देत नाही किंवा कोणतीही राजकारणी व्यक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version