Home देश १४ फेबु्वारीला केजरीवाल घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

१४ फेबु्वारीला केजरीवाल घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

1

विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यास सज्ज झाले आहेत.

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यास सज्ज झाले आहेत.

वर्षभरापूर्वी दिल्लीकरांची माफी मागत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर वर्षभरानंतर केजरीवाल पुन्हा दिल्लीत सरकार स्थापन करणार आहेत. १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानात शपथविधी सोहळा होणार असून यावेळी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

‘१४ फेब्रुवारीला रामलीला मैदानात अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील’ असे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी सांगितले. या निवडणुकीत केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाच्या नुपूर शर्मा यांचा तब्बल ३१ हजार ५८३ मतांनी पराभव केला.

२०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावर दिल्लीत सत्ता स्थापन केली होती. २८ डिसेंबर रोजी रामलीला मैदानात केजरीवाल यांनी दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ४९ दिवसांचे सरकार चालवल्यानंतर जनलोकपाल विधेयकाच्या मुद्याचे भांडवल करुन केजरीवाल सरकारने राजीनामा दिला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version