Home महामुंबई ६०० गिरणी कामगारांचे घर हुकणार

६०० गिरणी कामगारांचे घर हुकणार

4

गिरणी कामगारांसाठी म्हाडाने काढलेल्या घरांच्या सोडतीतील सुमारे ६०० गिरणी कामगारांचा दोन वर्षानंतरही पत्ता नसल्याने या कामगारांचे घरांचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. 

मुंबई – गिरणी कामगारांसाठी म्हाडाने काढलेल्या घरांच्या सोडतीतील सुमारे ६०० गिरणी कामगारांचा दोन वर्षानंतरही पत्ता नसल्याने या कामगारांचे घरांचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. घर लागल्यानंतर पात्रता निश्चितीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या अर्जदारांनी अद्याप सादर न केल्याने या कामगारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

[poll id=”782″]

म्हाडाने २०१२मध्ये १९ गिरण्यांच्या जागांवर बांधलेल्या घरांची सोडत काढली. या सोडतीत ६ हजार ९२५ गिरणी कामगार विजेते ठरले. विजेत्या गिरणी कामगारांना घरांसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी मुदतीत कागदपत्रे सादर करण्यासाठी क ळवण्यात आले होते. मात्र यातील सुमारे ६०० गिरणी कामगारांनी प्रतिसाद दिला नाही.

या अर्जदारांनी कोणताही संपर्कही केला नाही. त्यामुळे संबंधित अर्जदारांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर म्हाडाने पत्राद्वारे कळवले. मात्र त्यानंतरही संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही. कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत वाढवून म्हाडाने त्यांना आणखी संधी दिली. तरीही या अर्जदारांचा पत्ताच नसल्याने अखेर त्यांना अपात्र करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

या अर्जदारांच्या घरांचा आता प्रतीक्षा यादीवर असणा-या अर्जदारांसाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीवर असलेल्या अर्जदारांना पात्रतेसाठी आवश्यक पुरावे सादर करावे लागणार आहेत. आतापर्यंत साडेपाच हजार कामगार व वारसांना घरांचा ताबा मिळाला आहे.

सध्या विधानसभा निवडणुका असल्याने कर्मचारी, अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित घरांची ताबा प्रक्रिया दीड महिन्यानंतरच वेग घेईल, असे सांगण्यात आले.

4 COMMENTS

  1. सरकारला खरोखरच हि योजना नेटाने राबवायची असेल तर या योजनेत पारदर्शिपनाच दिसला पाहिजे. अन्यथा याचा फायदा गुंड , राजकारणी किवा अन्य कोणीतरी घेतील .

  2. कागदपत्रे दाखल न केलेल्या गिरणी कामगारांशी म्हाडाकडून अनेकदा पत्र व्यवहार होऊनही, वेळोवेळी मुदतवाढ देऊनही त्यांनी अद्यापी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. असे गिरणी कामगार खाली नमूद कारणांमुळेच अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर करत नाहीत –
    (अ) 1 जानेवारी 1982 पूर्वीचे गिरणी कामगार
    (ब) मुळातच गिरणी कामगार नसलेले (बोगस) ज्यांच्याकडे गिरणीचा गेटपास,
    भविष्यनिर्वाह निधीपत्र, नियुक्तीपत्र यापैकी एकही पुरावा नसलेले
    (क) गिरणीच्या जमिनीवरील चाळीत मोफत घर मिळालेले / गिरणीच्या जमिनीवरील चाळीत घरे असल्याने नुकसान भरपाई मिळालेले
    (ड) कामगारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले असल्यामुळे सोडतीत दोन सदनिका
    लागलेले
    (इ) सोडतीत मृत कामगाराचे वारस- पत्नी व मुले यांनी एकापेक्षा अधिक अर्ज
    केले असल्यामुळे सोडतीत दोन सदनिका लागलेले
    (ई) कामगारांनी एकापेक्षा अधिक गिरण्यांमध्ये काम केल्याने त्यानी दोन संकेत
    क्रमांकावर अर्ज केले असल्यामुळे सोडतीत दोन संकेत क्रमांकावर सदनिका
    लागलेले
    (उ) कामगारांनी काम केलेल्या जागेच्या ठिकाणी अर्ज भरावयाचे असताना
    चुकीच्या संकेत क्रमांकावर अर्ज भरुन सदनिका लागलेले

    गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची छाननी/पडताळणी म्हाडातर्फे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चालू आहे. वर नमूद प्रकारांत (अ.क्र – अ ते उ) मोङत असलेल्या गिरणी कामगार नियमानुसार अपात्र ठरणार हे स्पष्ट असल्याने त्यांच्या एवजी प्रतीक्षा यादीवरील कामगारांची गिरणीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेस ‘म्हाडा’ प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे त्यामुळे शासनास आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सदरची प्रक्रिया लवकरात लवकर सुरुवात होणे आवश्‍यक आहे. चार वर्षां पासून घरे बांधून तयार आहेत, 600 प्रतीक्षा यादीवरील कामगारांनी घरे ताब्यात घेतली तर शासनाकडे 60 ते 70 कोटी निधी उपलब्ध होईल.

    सदर 600 अपात्र गिरणी कामगारांची गिरणीनिहाय यादी प्रसिद्ध करून त्यांना प्राधान्यक्रमाने कागदपत्रे जमा करण्यास सांगून, त्यांची पात्रता तपासून घरे वितरण प्रक्रियेस आणखी एक वर्ष लागण्याची शक्‍यता आहे. तरी सदर 600 गिरणी कामगारांस अपात्र म्हणून घोषित करुन प्रतीक्षा यादीवरील कामगारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर कधी प्रसिद्ध होईल याबाबत तसेच प्रत्येक गिरणीनिहाय किती गिरणी कामगारांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर केलेली नाहीत यांच्या संख्येबाबत माहीती म्हाडाने अद्यापी गुलदस्त्यातच ठेवली आहे सदर माहीती प्रहारच्या वाचकांसाठी / प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून दयावी, ही आग्राहाची नम्र विनंती. जेणेकरुन प्रतीक्षा यादीवरीलही गिरणी कामगार घरे मिळणार म्हणून आश्वस्त राहतील व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तयारीला लागतील.

  3. Namskar sir
    karan anek ase girni kamgar ahet tynchykde contact number nahit ani kay chalay te kalat nahi
    majha application number 35774 ahe pan mi contact konala karu tech samjat nahi tumhi mala madat kara hi namr vinati

    girni kamgar
    standard china mill , shivdi
    yashwant govind jori

  4. १ जानेवारी २००२ नंतर कामावर असणारे गिरणी कामगार यांना घर देण्याचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढला होता. त्यात पृथ्वीराज चव्हानानी १ जानेवारी १९८२ नंतर कामावर असणारे गिरणी कामगार यांना घरे देणार म्हणून जाहीर केले. हे विलासराव देशमुख यांचा निधन झाल्यानंतर. म्हणून सगळी गडबड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version