Home महाराष्ट्र कोकण चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!

चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!

1

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिकार आपल्याकडे सोपवण्यात आले आहेत. 

चिपळूण- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिकार आपल्याकडे सोपवण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दूरध्वनीवरून याबाबत आपल्याला स्पष्ट कळवले आहे.

त्यामुळे गेले काही महिने निवडणुकीच्या अधिकारावरून पक्षात असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे, अशी माहिती देत नगर पालिका निवडणुकीत पक्षाचे २० उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार माजी आमदार रमेश कदम यांनी सोमवारी जयेश निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवला. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव यांना जोरदार धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक लवकरच होत आहे; मात्र या निवडणुकीतील राष्ट्रवादीची सूत्रे कोणाकडे जाणार? याबाबत उत्सुकता होती. यावरून वृत्तपत्र, सोशल मीडियावर वेगवेगळी माहिती येत होती; परंतु सोमवारी सकाळी ११ वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आपल्याला फोन आला आणि चिपळूण तालुका व शहरात होणा-या निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

निवडणुकीचे सर्वाधिकार सोपवण्यात आल्याने आपण ही जबाबदारी स्वीकारली आहे. येत्या दोन दिवसांत आपण कामाला सुरुवात करणार आहोत. उमेदवार ठरवणे, त्यांच्याकडून अर्ज मागवणे, त्यांच्या मुलाखती घेणे, याचे सर्वाधिकार आपल्याकडे आले आहेत, असे कदम यांनी स्पष्ट केले.

‘त्यांच्या’साठी पुरेपूर फिल्डिंग

गेल्या पाच वर्षात कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. हा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना रमेश कदम म्हणाले की, पक्षातील नगरसेवकांनी विरोधी भूमिका घेतल्याने याचा फटका विकासकामांना बसला.

त्यांनी केलेल्या तक्रारींमुळे शहरातील महत्त्वाची कामे होऊ शकली नाहीत; परंतु येत्या निवडणुकीत हे नगरसेवक नगर परिषदेत दिसणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेऊ, असे सांगून त्यांनी पक्षातील विरोधकांना सूचक इशारा दिला.

1 COMMENT

  1. Bhai, Lai Bhari!!!
    भाई लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version