Home महामुंबई म्हाडातर्फे २ डिसेंबरला गिरणी कामगारांसाठी सोडत

म्हाडातर्फे २ डिसेंबरला गिरणी कामगारांसाठी सोडत

1

एमएमआरडीएने बांधलेल्या पनवेल येथील २४१७ सदनिकांची संगणकीय सोडत म्हाडातर्फे २ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी दहा वाजता वांद्रे पूर्व येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

मुंबई- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील २४१७ सदनिकांची संगणकीय सोडत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) तर्फे २ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी दहा वाजता वांद्रे पूर्व येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. ही सोडत गिरणी कामगारांकरिता काढण्यात येणार आहे.

एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका या प्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी सहा लाख रुपये आकारून गिरणी कामगारांना यावेळी वितरित करण्यात येणार आहेत. या सोडत प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गिरणी कामगार तसेच त्यांच्या वारसांची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या सोडतीमध्ये म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १,४८,७११ गिरणी कामगार तसेच वारस यांच्या यादीमधून २०१२च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, २०१२च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिम वेळी अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमधील अर्जदार, तसेच म्हाडाच्या मे २०१६च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना यावेळी काढण्यात येणा-या सोडतीतून वगळण्यात येणार आहे.

या वगळण्यात येणा-या अर्जदारांव्यतिरिक्त उर्वरित अर्जदारांचा या सोडत प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वान मिल कुर्ला आणि शिवडी या मिलच्या अर्जदारांचा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version