Home टॉप स्टोरी राज ठाकरेंच्या फेसबूक पेजचे अनावरण

राज ठाकरेंच्या फेसबूक पेजचे अनावरण

20

फेसबूक पेज अनावरण सोहळ्यात राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली..

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेसबूक पेजची चर्चा सुरू होती. अखेर गुरूवारी रविंद्र नाट्यमंदिरात या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. फेसबुक पेज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तब्बल साडेचार लाख लाईक्स मिळाले आहेत तर ट्विटरवरही RajThackerayOnFB हॅशटॅग चौथ्या स्थानावर आहे.

लोकांशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाईल, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. व्यंगचित्र, कामे, मते, धोरणे आणि लोकांना माहिती नसलेल्या गोष्टी फेसबूकच्या माध्यमातून त्यांच्यासमोर आणणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

फेसबूक पेज अनावरण सोहळ्यात राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली. सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यात दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याची योजना केंद्रात सुरु आहे. स्वतः दाऊदला भारतात यायचे आहे. तो स्वतः विकलांग झाला आहे. त्यामुळेच सध्या तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे, असा गंभीर आरोप ठाकरेंनी भाजपावर केला आहे.

गुजरात आणि मुंबईतल्या गुजराती माणसाच्या सोयीसाठी तुम्ही एक १०हजार कोटींचे कर्ज काढून बुलेट ट्रेन बनवणार आहेत. मुंबईतून मेट्रो ट्रेन जिथून जाणारे आहे तिथले जागांचे भाव प्रचंड वाढले आहेत. या ठिकाणी घर विकत घेणे कठिण बनले आहे. मेट्रोचा आराखडाही मराठी माणसाचे महत्व कमी करण्याच्या हेतूने आखण्यात आला आहे. विकास कामांच्या नावाखाली अन्य भाषिकांचे मतदारसंघ तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी टिका राज यांनी केली.

20 COMMENTS

  1. राजसाहेब, आता फक्त तुम्ही मराठी माणसाची अस्मिता जपू शकता.

    • आम्ही त्या नेत्याचे कार्यकर्ते आहोत ज्यांच्यावर आज हि शंभर च्या वर केसेस आहे. जो नेता खिशात अटक वारंट घेऊन फिरतो. आमच्या शेकडो कार्यकर्त्यावर केसेस चालतात. न्यायालयात जाऊन हे फेरफटका मारल्या सारख ज्याना वाटत. त्यांना तुम्ही नोटीसची भिती दाखवतात. आहो आम्ही पोलिसांच्या दांडक्याला नाही घाबरलो तर नोटिसला काय घाबरणार. दबाव तंत्राला आम्ही भिक घालत नाही जा. जे सत्य आहे ते बोलणारच. काय कराच ते करा. आमची तोंड दाबली की हात मोकळे करतो आम्ही.. कट्टर मनसे सैनिक : नितीन कानडे

  2. राज साहेब, मराठी माणसाची अस्मिता जोपासाचे कठीण कार्य तुम्हीच करू शकता. विश्वास आहे. आम्ही सर्व सोबत आहोत.

  3. माध्यम प्रभावी आहे…पक्षाने ग्रामीण भागात लक्ष देणे गरजेचे आहे. तरुण साहेबांच्या व्यक्तिमत्वाला आकर्षित आहेत पण पक्षाची भूमिका महत्वाची आहे.

  4. राजसाहेब, मराठी माणसाची अस्मिता जोपासण्याचे कठीण कार्य तुम्हीच करू शकता. विश्वास आहे. आम्ही सर्व सोबत आहोत.

  5. आपण मला मदत करावी.
    [9/25, 15:15] sanjaypoojari005: ठराव करून माझ्या कुटुंबाला वाळीत टाकणे, मुलाला मारहाण करणे, झाडे तोडणे व जीवे ठार मारण्याची धमकी देणे त्यासंबंधी संबंधीतावर योग्य ती कारवाई करणेबाबत.
    [9/25, 15:16] sanjaypoojari005: माननीय महोदय,

                           मी संजय शेखर पुजारी ता. पनवेल, जि. रायगड येथील पत्त्यावर माझी पत्नी आणि माझी दोन मुले 1. विघ्नेश 2. प्रज्ञेश यांच्या समवेत सात वर्षांपासून ओमकार पार्क 2 विचुम्बे  येथे राहत आहे.

     

                         ओमकार पार्क 2 सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत बांधलेल्या इमारती मधील बी/९ ही मिलकीयत धाकपट दाखवून मिळवायची असा दत्तात्रय चौलकर व चंद्रकांत सरफरे यांचा मानस होता व आहे. सबब हे दोघेही माझ्याकडून चार लाख घे व हे घर दत्तात्रय चौलकर व चंद्रकांत सरफरे यांच्या नावे कर असे म्हणाले आहेत, नाहीतर आम्ही दोघे तुला हाकलून लावू संबधित व्यक्ती हे सोसायटीचे खजिनदार असताना सोसिएटीच्या पदाधिकार्यांना व रहिवाशांना एकत्रित करून भागवत कारंडे यांच्या आदेशाने १२/०७/२०१५ रोजी व जितेंद्र तरडे यांच्या आदेशाने १८/०९/२०१६ रोजी सभेत जे सदस्य हजर होते त्यांच्या मार्फत ठराव मंजूर करून माझ्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे.

    सदर त्या ठरावाप्रमाणे व वेगवेगळ्या पद्धतीने वाईट वागणूक दिली जात आहे.

                    फेब्रुवारी २०१५ महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात माझा मुलगा प्रज्ञेश वय ७ ह्याचे दोन ऑपरेशन झाले आहेत व त्याला TB या आजाराने ग्रासलेले आहे. त्याला भगवंत करंडे यांच्या पत्नीने काठी-काठीने बेदम मारहाण केली. सदर प्रसंगी भगवंत करंडे मला धमकी दिली की, मी जर पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार केली तर तेही मला अशाच प्रकारे मारतील, म्हणून मी त्यांच्या विरोधात भीतीने तक्रार केली नाही.

                 झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मी झाडे लावली. ती झाडे ०२/१०/२०१६ रोजी संबंधित व्यक्तीने ती झाडे तोडली व मला असे म्हणाले, अखेरची तुझी झाडे बघून घे, पाहिजे तर फोटो काढून घे, ज्याला तक्रार करायची असेल त्याला कर आम्ही घाबरत नाही.

    म्हणून मी माझ्या मोबाईल ने झाडे तोडताना प्रत्यक्ष चित्रिकरण केले.

                 मी ११/११/२०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब (गृहमंत्री), विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब, पोलीस आयुक्त(बेलापूर, नवी मुंबई), खांदेश्वर पोलीस स्टेशन, जातपंचायत, विचुंबे ग्रामपंचायत, तहसीलदार, वनविभाग,जिल्हाधिकारी सहाय्यनिबंधक, 

                १५/०६/२०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पोलीस आयुक्त(बेलापूर, नवी मुंबई) यांना सदर पुरावे अवलोकणास जोडून दिले आहेत.

    सदर अजूनही कोणतीच कारवाही झालेली नाही.

                 त्यामुळे माझ्या कुटूंबाला न्याय मिळालेला नाही.

    आपण मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यास मदत करावी अशी आपणास नम्र विनंती.

    आपला विश्वासू

    संजय शेखर पुजारी

    सदर फर्यादीबाबत सर्व पुरावे आपणास आवलोकणास मी यासोबत पाठवत आहे.
    [9/25, 16:48] sanjaypoojari005: Phone number 8097708731/8097265597

  6. माननीय राज साहेब ठाकरे यांस ,
    सर मी आपल्याच बालेकिल्ल्यात रहातो.माहिम जरीवला चाळ, टी.एच.कटरिया मार्ग, माहिम, मुम्बई- 400016 हा माझा पत्ता आहे. आमच्या चाळीच्या विकासाचा अंतिम निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी देऊन विकासक कुठलीच कार्यवाही करीत नाही आहे. तसेच mhada चे अधिकारी या विकासकाशी संगनमत करून लोकांना त्रास देत आहेत. आमच्या चाळीच्या विकासाचा प्रश्न मागील 28 वर्षांपासून रखडला होता. या विकासाच्या आशेने एक पिढी म्रुत्यु पावली. आता दूसरी पिढी मरणाच्या वाटेवर आहे. एकूण 187 रहिवाशी या चाळीत रहातात. त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात देखील विकासकाच्या विरोधात जाऊ शकत नाही.आपण या चाळीच्या विकासाचा प्रश्न हाती घ्यावा अशी आमची तीव्र ईच्छा आहे. आपण आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी खात्री आहे. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version