Home टॉप स्टोरी नगर परिषद-पंचायतींच्या तिस-या टप्प्यात ७२.७६ टक्के मतदान

नगर परिषद-पंचायतींच्या तिस-या टप्प्यात ७२.७६ टक्के मतदान

1

१९ नगर परिषदा व २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार रविवारी सरासरी ७२.७६ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

मुंबई- राज्यातील नांदेड, औरंगाबाद, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांतील १९ नगर परिषदा व २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार रविवारी सरासरी ७२.७६ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून येथे मतमोजणी होणार असून दुपापर्यंत निकाल हाती येतील.

एकूण २१२ नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका चार टप्प्यांत होत आहेत. रविवारी तिस-या टप्प्यासाठी नांदेड, औरंगाबाद, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यात मतदान झाले. १९ नगर परिषदा व २ नगर पंचायतींच्या सदस्यांच्या एकूण ४०९ जागांसाठी १ हजार ९४७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

थेट नगराध्यक्ष पदाच्या १९ जागांसाठी १११ उमेदवारांमध्ये लढत झाली. या सर्व ठिकाणी एकूण ५ लाख १६ हजार ४७८ मतदारांसाठी ६८३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगर परिषदेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु न्यायालयाच्या स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही.

त्याचबरोबर देसाईगंज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील ९-ब या जागेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार या जागेसाठी आता २२ जानेवारी, २०१७ रोजी मतदान होणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. पूर्वी जिथे BJP कुठेही नव्हती तिथे BJP ने पाय रोवले आहे,राष्ट्रवादी,शिवसेनेला मागे टाकले आहे,कॉंग्रेसच्या बरोबरीने जात आहे,अर्थात हे दुर्दैव कॉंग्रेस इतकी घातीय असूनही काही ठिकाणी जिंकली,60 वर्ष लुटूनहि जिंकली हे मतदारांचे दुर्दैव,पण नोटबंदी नंतर हि सगळे निकाल मिळून BJP कॉंग्रेसच्या पुढेच आहे,पण मटा मध्ये बातमी बघा कॉंग्रेसची घौडदौड ,काही मूर्ख बोलतील केंद्रात आणि राज्यात BJP सरकार म्हणून निवडून आले,गेल्या 15 वर्षात कॉंग्रेस,पवारची सत्ता असूनही मुख्य महापालिका जसे मुंबई,ठाणे,KDMC इ युतीने कशा जिंकल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version