Home देश शहराकडे चला.. नव्या पिढीचा नवा मंत्र

शहराकडे चला.. नव्या पिढीचा नवा मंत्र

1

गावातून शहरात लोंढेच्या लोंढे आदळत असून येत्या २०५० पर्यंत ६० टक्के भारतीय शहरात राहतील, अशी कबुली केंद्रीय नगरविकास मंत्री इंद्रजीतसिंग राव यांनी बुधवारी दिली.

नवी दिल्ली- भारतीयांमध्ये गावात राहण्याऐवजी शहरात राहण्याचे आकर्षण चांगलेच वाढलेले आहे. गावातून शहरात लोंढेच्या लोंढे आदळत असून येत्या २०५० पर्यंत ६० टक्के भारतीय शहरात राहतील, अशी कबुली केंद्रीय नगरविकास मंत्री इंद्रजीतसिंग राव यांनी बुधवारी दिली.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना ते म्हणाले की, सध्या देशात नागरीकरण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार ३१ टक्के जनता शहरात राहत असल्याचे आढळले. येत्या काही दशकांत अधिकाधिक नागरिक शहरात राहायला येतील. २०५० पर्यंत ६० टक्के जनता शहरात राहत असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील नागरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेता केंद्र सरकारने शहरांसाठी विविध योजना आणल्या आहेत. ‘अमृत’ योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मोठय़ा शहरांची क्षमता वाढवण्याचे ठरवले आहे. तर दुस-या टप्प्यात छोटय़ा शहरांची क्षमता वाढवण्याचे ठरवले आहे. पाणीपुरवठा, मल:निस्सारण, गटार, वाहतूक व हरित परिसर आदी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे, असे सिंग म्हणाले.

जागतिक बॅँक व परदेशी वित्त संस्थेची मदत ‘अमृत’ योजनेत देण्यात येणार नाही. या योजनेत विविध योजनांना केंद्र सरकार, राज्य सरकार, शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आदींना आर्थिक मदत देईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:च्या संसाधनातून पैसा उभा करायचा आहे. यासाठी ते अन्य संस्थांचीही मदत घेऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

  1. काय घंटा हाय का शहरात मने शहरा कड चला गांधीजींनी काय सांगितले होते लक्ष्यात नाय का ते मानले होते खेड्याकडे चला गपमुकाट्याने गावाला जावा मराठी सांगिटले कळलं नाय का का इंग्लिश मध्ये सांगू का अन अरची म्हणती ऎका बर का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version