Home टॉप स्टोरी राजीव सातव-नितीन गडकरी भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

राजीव सातव-नितीन गडकरी भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

1

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय खा. राजीव सातव यांनी शनिवारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

नागपूर- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय खा. राजीव सातव यांनी शनिवारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. मतदारसंघातील विकास कामांसाठी ही भेट घेतल्याचे सातव यांचे म्हणणे असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता निर्माण झाली आहे.हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव शनिवारी दुपारी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले.

राजीव सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. माझ्या मतदारसंघातील विकास कामांबाबात मी गडकरींची भेट घेतली असे सांगत राजीव सातव यांनी चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसमधील सद्यस्थिती पाहता या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. गडकरी यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत, सातव- गडकरी भेटही त्याचाच एक भाग असू शकतो याकडेही अनेकांनी लक्ष वेधले. विविध पक्षांमधील १५ ते १६ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर सातव- गडकरी भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सातव हे राहुल गांधीच्या टीममधील विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांच्याकडे गुजरातची जबाबदारीदेखील आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात ३५० हून अधिक खासदार निवडून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. राज्यात खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

[EPSB]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या, अहमदाबाद-मुंबई‘बुलेट ट्रेन’ची पायाभरणी अहमदाबादमध्ये गुरुवारी झाली. या प्रकल्पामुळे मोदींची स्वप्नपूर्ती होणार आहे. 

[/EPSB]

1 COMMENT

  1. सातव स्वतःच्या गावात गडकरींना भेटले . राणे साहेब अहमदाबाद ला जाऊन अमित शाह ना भेटले. राजकारण्यांनी एकमेकांच्या भेटी घेणे यात वावगे काहीच नाही. सर्व राजकारण्या मध्ये एवढी सहिष्णुता असलीच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version