पूँछमध्ये गेल्या पाच दिवसांत सात जवान शहीद

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील मेंढर उप-विभागात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत भिम्बर गल्ली भागात गुरुवारी दोन जवान शहीद झाल्याचं समजतंय. यामध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एका शिपाई रँकच्या जवानाचा समावेश आहे. रायफलधारी विक्रम सिंह नेगी (२६ वर्ष) आणि योगम्बर सिंह (२७ वर्ष) अशी या दोन जवानांची नावं आहेत. गुरुवारी झालेल्या चकमकी दरम्यान हे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. हे दोन्ही जवान मूळचे उत्तराखंडचे होते.


भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ ऑक्टोबरपासून दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत एकूण सात जवान शहीद झाले आहेत. यापूर्वी पूँछ राजौरीच्या मंडू भागात एका ज्युनिअर कमिशन्ड अधिकाऱ्यासहीत पाच जवान शहीद झाला होते. पूँछ जिल्ह्याच्या सीमावर्ती सुरनकोट भागातील 'डेरा की गली'जवळ एका गावात दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हे पाच सैनिक शहीद झाले होते.


नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर सेना आणि पोलिसांकडून संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली आहे पूँछ जिल्ह्यात सुरक्षा दलांवर हल्ला करणारे दहशतवादी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या भागांत उपस्थित असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दिली होती. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्याचं दिसून येत आहे. या मोहिमेदरम्यान सुरक्षादलानं आतापर्यंत १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. बुधवारी सुरक्षादलानं 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या शम सोफी याला पुलवामाच्या त्राल भागात ठार केलं.

Comments
Add Comment

UPI Rules : UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार का? जाणून घ्या सरकारचे नियम

मुंबई : भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या माध्यमांपैकी एक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स

BRICS Family Photo : ब्रिक्सच्या ‘फॅमिली फोटो’त मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकत्र; नवी दिल्लीतील छायाचित्राने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

नवी दिल्ली: १८व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या एका छायाचित्राने

Amit Shah : भाषा-संस्कृती जपणारे राष्ट्र कधीही गुलाम होत नाही!

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह; ‘डी-कोलोनायझेशन’ म्हणजे इतिहास पुसणे नव्हे, भारतीय दृष्टिकोनातून तो पुन्हा

Seemanchal Express Accident : सीमांचल एक्सप्रेसमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! ट्रेनमधून ९ महिन्यांचं बाळ पडलं; २३ तासांनी सापडला मृतदेह

दिल्लीतील आनंद विहारहून बिहारच्या दिशेने निघालेल्या सीमांचल एक्सप्रेसमध्ये हृदयद्रावक घटना घडली. ट्रेनमधून

Modi Xi Jinping talks : ‘सीमेवर शांतता आणि स्थैर्य हीच द्विपक्षीय संबंधांची प्राथमिक अट’; पंतप्रधान मोदींचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट संदेश

नवी दिल्ली: भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा व सहकार्याचा नवा अध्याय सुरू करण्याच्या प्रयत्नांदरम्यान,

BRICS Summit : मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचे लक्षवेधी हस्तांदोलन; बदलत्या जागतिक राजकारणाचे संकेत

नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे