मिलिंद गुणाजीचा मुलगा अभिषेक गुणाजी अडकला लग्न बंधनात

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द जोडी  मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजीचा लग्न समारंभ  अगदी पारंपरिकरित्या पार पडलाय. अभिषेक गुणाजी हा नुकताच राधा पाटील हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला.



या दोघांच्या हळदीचे आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत. या दोघांना नेटकरांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या लग्नाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे लग्न मुंबईतल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेलं नाही. तर मालवण येथील एका मंदिरात अगदी पारंपरिकरित्या पार पडलं.



. याबाबत मिलिंद गुणाजीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की , आम्ही एक कुटुंब म्हणून आपली संस्कृती आणि वारसा जपला आहे. म्हणून आम्ही वालावल, मालवण येथे खाजगी समारंभ करण्याचे निवडले आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा, अतुलनीय पर्यटनस्थळांचा आणि अजोड गडकिल्ल्यांच्या खजिन्याचा मी नेहमीच प्रचार करत आलोय. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा व्हावा अशी आमची इच्छा होती. हा महत्वाचा संदेश आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतून देण्याचा हा आमचा एक प्रयत्न होता. महाराष्ट्रात असलेली पर्यटन स्थळे परदेशातल्या पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत.त्यामुळे अशाच सुंदर डेस्टिनेशन वर हा लग्नसोहळा करण्याचे ठरले."

या लग्नसोहळ्यासाठी अभिषेक, मिलिंद आणि राणी गुणाजी एकदी पारंपरिकरित्या सजले होते...



अभिषेकच्या हळदीला राणी गुणाजीने मस्त ताल धरला.



अभिषेकची पत्नी राधा ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’